हवामान पुरक सकस आहार- कोशिंबीरी

67567559 1172845622923748 6673840374336716800 n

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सृजन अंतर्गत हवामान पुरक सकस आहार- कोशिंबीरी हा कार्यक्रम घेण्यात आला. हवामान बदलाचा पहिला तडाखा हा आपल्या आरोग्यावर पडत असतो. सतत बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला-ताप असे आजार होत असतात. अशावेळी कोणत्या प्रकारच्या आहार घेतला असता मुले निरोगी राहू शकतील यावर सृष्टी संस्थेच्या संगीता खरात यांनी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर कडधान्ये, दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ, कच्ची पपई, कोबी यासारख्या मुले शक्यतो न खाणा-या भाज्यांपासून विविध कोशिंबीरी बनवन्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. मुलांनी भाज्या चिरणे, साले काढणे, किसणे अशा सर्व कामात खुप उत्साहाने भाग घेतला.
अन्नपचन संस्था उत्तम राबवण्यासाठी प्रथिने, जीवनसत्वे आणि चोथा हे खुप महत्वाचे घटक अन्नमधून मिळवायचे असतील तर कोशिंबीरी हे पुर्णान्त म्हणून उपयुक्त आहेत. त्याशिवाय मुलांमध्ये जेवन बनवण्यासाठी प्राथमिक पायरी म्हणून कोशिंबीरी बनवणे हा महत्वाचा टप्पा आहे.

बांधणी कार्यशाळा

WhatsApp Image 2019 07 25 at 11.22.52 AM

भारतात विशेषतः गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये वापरल्या जाणार्या प्राचीन हस्तकलांपैकी बांधणी एक आहे. भारतात साडी, कुर्ता व ओढणी तयार करण्यासाठी बांधणी कला वापरली गेली आहे. शब्द 'बांधणी' हा शब्द बंधन पासून बनलेला आहे. ज्याचा अर्थ कापड बांधणे असा आहे. कापड तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जे वायब्रेंट रंग वापरून नमुने आणि फॉर्म तयार करतात. प्राचीन भारतीय संस्कृती आणि कलांबद्दल मुलांना जागृकता निर्माण व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पूजा शिंदे, प्राची घाणेकर, शिवानी धनावडे यांनी या कार्यशाळेत मुलांना मार्गदर्शन केले. ठळक आणि उज्ज्वल रंग मुलांना सृजनशीलता, सकारात्मकता आणि एकत्रितता आणण्यास प्रोत्साहित करतात.

   

सृजन छायाचित्र गॅलरी  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft