भाषण पाठांतर करून नाहीतर आत्मसात करून करा : चंद्रकांत कुलकर्णी

यशवंत शब्दगौरव मुंबई विभागीय फेरीची प्राची जोशी मानकरी !

WhatsApp Image 2019 09 01 at 6.36.33 PM

दि. ३१ (मुंबई) : भाषणकला तुमचे आयुष्य घडवते परंतु पाठांतर करून बोलणे म्हणजे भाषण नव्हे, भाषण करतांना तुमचे विचार आणि भूमिका स्पष्टपणे दिसल्या पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उभे राहते. तुमच्या व्यक्तिमत्वात ठामपणा येतो. आताच्या सोशल मीडियावरील ट्रोलर्स च्या काळात तुमच्यातील ठामपणा आणि विवेकी विचारांची गरज आहे. ती अंमलात आणा, तुमच्या मनातील विचार हे भाषण कलेतून मांडा, पाठांतर करून नव्हे, असे आवाहन प्रसिद्ध नाट्य-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियान व मराठी विभाग, रामनारायन रुईया स्वायत्त महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या मुंबई विभागीय फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनीष हाटे, नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. लीना केदारे, विजय कसबे उपस्थित होते.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यातील ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून जयदेवी स्वामी, दीपा कदम, अस्मिता मोहिते, महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या मुंबई विभागीय फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक : प्राची

युवा स्वातंत्र्यज्योत रॅली - मुंबई

WhatsApp Image 2019 08 14 at 11.01.15 PM

दिनांक. १४ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र पुरुषांना अभिवादन करण्यासाठी तरुणांमध्ये स्वातंत्र्य दिनाविषयी आदराची जाणीव व जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. युवा स्वातंत्र्यज्योत रॅलीची सुरुवात श्री. सुरज भोईर यांच्या प्रस्ताविकाने झाली. त्यांनी सदर युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीचा उद्देश सहभागींसमोर मांडला. यानंतर प्रमुख पाहुणे मा. डॉ. जी.जी.परीख (ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, व अध्यक्ष - युसूफ मेहेरअली सेंटर) यांनी तसेच गांधी बुक सेंटर चे विश्वस्त आर.के. सोमय्या सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व युवा पिढीच्या भविष्यात काय काय अपेक्षा आहेत आणि त्यांचे दायित्व काय आहे आणि असावे यावर विवेचन केले.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft