यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व 
क्रीडा युवा पुरस्कार २०१९-२०

साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई व 
नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम...

WhatsApp Image 2019 12 16 at 12.04.19 PM

मुंबईदरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(एक युवक व एक युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(एक युवक व एक युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्‍या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे १९ वे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे
हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्‍या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. २१,०००/- चा धनादेशस्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०१९ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनीशी दिलेल्या फॉर्मवर भरुन सोमवार दि. ३० डिसेंबर २०१९ च्या आत संघटकनवमहाराष्ट्र युवा अभियानयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानजनरल जगन्नाथराव भोसले मार्गमंत्रालयासमोरमुंबई - २१ या पत्त्यावरअथवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये (मनिषा) ०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा सुबोध (९८२३०६७८७९) व रमेश (९००४६५२२६२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.

 डाऊनलोड माहितीपत्रक व फॉर्म
     राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार अर्ज 
     राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार नियमावली
     राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार अर्ज
     राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार नियमावली

 

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन
नियतकालिक स्पर्धा २०१९-२० साठी अंक पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम

WhatsApp Image 2019 12 16 at 12.04.20 PM

मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१९-२०' चे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालिकांमध्ये पडलेले पहावयास मिळते या नियतकालिकांमध्ये आपले लेख, कविता लिहणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यिक घडत असतात. युवांना आपले मत मांडायची संधी देतानाचा त्यांच्यातील कलागुणांना वाव देणाऱ्या नियतकालिकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालिकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे.
स्पर्धेत राज्यातील उत्कृष्ट महाविद्यालयीन नियतकालीकांस यशवंतराव चव्हाण पारितोषिकाने सन्मानित केले जाते. प्रथम पारितोषिक रु. १०,०००/- चा धनादेश, द्वितीय पारितोषिक रु. ७,०००/- चा धनादेश, तृतीय पारितोषिक रु. ५,०००/- चा धनादेश, उत्तेजनार्थ (पंधरा पारितोषिके - प्रत्येक विद्यापीठातून एक) रु. ३,०००/- प्रत्येकी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे स्पर्धेचे स्वरुप आहे. सादर केलेल्या नियतकालीकांचे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये जतन करुन ते विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपलब्ध केले जाते.
स्पर्धेकरिता महाविद्यालयांनी आपली नियतकालीकांच्या दोन प्रती सोमवार, दि. ३० डिसेंबर २०१९ च्या आत प्रति, संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई - २१. या पत्त्यावर पाठवावेत. लिफाफ्यावर 'यशवतंराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धा' असा उल्लेख करण्यात यावा. अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये (मनीषा) ०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा सुबोध - ९८२३०६७८७९, रमेश - ९००४६५२२६२ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.


यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व
स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत रंगली...

अभिजीत अनिल खोडके प्रथम, तर ऐश्वर्या एस.भद्रे द्वितीय...

9 19 2019 11 16 35 AM

मुंबई १८ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे आयोजित 'यशवंत शब्दगौरव' राज्यस्तरीय अंतिम फेरी बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रियाताई सुळे तसेच सरचिटणीस श्री. शरद काळे यावेळी उपस्थित होते.

यशवंत शब्दगौरव राज्यस्तरीय स्पर्धा ९ विभागामध्ये घेण्यात आली, त्यामध्ये ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक अभिजीत अनिल खोडके (सीपी अॅन्ड बेरार कॉलेज नागपूर ) यांना १५,००० रुपये रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर दुसरा क्रमांक ऐश्वर्या एस. भद्रे (मुंबई विद्यापीठ ) १०,००० रुपये रोख रक्कम व मानचिन्ह व तिसरा क्रमांक शुभम सतीश शेंडे (एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर) ह्यास ७००० रुपये रोख व मानचिन्हे तसेच उत्तेजनार्थ म्हणून जीवन प्रकाश गावंडे (श्री शिवाजी आर्ट व कॉमर्स, अमरावती), गणेश ज्ञानदेव लोळगे (एएमजीओआय, कोल्हापूर ), श्रुती अशोक बोरस्ते ( एचपीटी कॉलेज, नाशिक), अभिजीत अंबारास जाधव ( एसएमटी, सीएचएम कॉलेज, मुंबई) व तेजस दिनकर पाटील (मॉर्डन कॉलेज,पुणे ) ३००० रोख रुपये व मानचिन्ह देण्यात आले.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft