"COVID 19 नंतरची युवकांसमोरील आव्हाने व सरकारचा दृष्टिकोन" चर्चासत्र...

WhatsApp Image 2020 05 09 at 6.42.50 PM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई च्या नवमहाराष्ट्र युवा अभियान व महाराष्ट्र चेबंर ऑफ कॉमर्स अँग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगशाळेमार्फत सर्व उद्योजक व युवकांसाठी "COVID 19 नंतरची युवकांसमोरील आव्हाने व सरकारचा दृष्टिकोन" याविषयावर चर्चासत्राचे आयोजन झुम अँपवर करण्यात आले आहे यावेळी मा. ना. अदिती तटकरे, उद्योग व युवा कल्याण राज्यमंत्री चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहे. चर्चासत्र सोमवार, दिनांक ११ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता होणार असून यासाठी झुम (ZOOM) APPSचा Meeting id : 81022128238 व Password : UDYOG111 असा आहे. कृपया सहभागवी व्हावे असे आयोजकातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध कवी, समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील
यांच्या मुलाखतीचं आयोजन...

WhatsApp Image 2020 03 07 at 10.55.49 AM

मुंबई ; दि. ६ : चंद्रकांत नागेशराव पाटील यांचा जन्म ०३ सप्टेंबर १९४४ रोजी अंबाजोगाईबीड येथे झाला. ते मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील१९६०नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठी प्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला आहे. मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार त्यांना १४ सप्टेंबर,२०१९ रोजी प्रदान करण्यात आला आहे.
मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. भीष्म सहानी यांचीतमसही कादंबरी, चंद्रकांत देवताले, पाश इत्यादी नामवंत कवींचे मराठी अनुवाद, मराठी कवितांचे हिंदी अनुवाद, परदेशातील कवींच्या निवडक कवितांचे मराठी अनुवाद, मराठी आणि हिंदी भाषेत लिहीलेली साहित्य समीक्षा, 
वर्तमानपत्रांतून स्तंभ लेखन अशा माध्यमांतून ते व्यक्त होत असतात. हिंदी आणि मराठी भाषेत चंद्रकांत पाटील यांची आजवर ५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आले होते. त्यांची ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अभ्यासक सुनील तांबे यांनी घेतली.
या मुलाखतीत कविता, संमेलने, अनुवाद, वाचनीयता, साहित्य व्यवहार या अनुषंगाने डॉ. चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी त्यांच्या साहित्याबद्दलचा, त्याच्या लेखनाबद्दलचा, त्यांनी केलेल्या लेखनाचा, अनुभवांचा उलगडा केला.
आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या अनुभवांचं प्रभावी शब्दांकन करणं आणि कमीत कमी शब्दांत शब्दांकन करणं आणि त्याच्या आधारे एक सृष्टी निर्माण करणं, एक जग निर्माण करण हिच माझी कवितेबद्दलची भूमिका आहे, असं संक्षिप्त मत त्यांनी व्यक्त केलं.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, कवी वसंत गुर्जर, श्याम मनोहर, रामदासजी भटकळ, राम दुतोंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

ही मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/Jx2yPPPXNb0

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft