यशवंतरावचव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व
क्रीडा युवा पुरस्कार -२०२०-२१ जाहीर

चंद्रशेखर तांदळे व गायत्री सावजी यांना सामाजिक पुरस्कार
हर्षद राव व निकिता पवार यांना क्रीडा पुरस्कार
तर मानसी जोशी विशेष युवा क्रीडा पुरस्काराची...ठरले मानकरी

banner youva award 2021

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०२०-२१’ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणा-या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. सदरील पुरस्कारांचे वितरण नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

या वर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, वाळवा, जि. सांगली (दुष्काळग्रस्तांना 'एक ओंजळ दुष्काळग्रस्तांसाठी' हे अभियान राबविले. ग्रामीण, दुर्गम व डोंगरी भागातील नागरिक मुख्य प्रवाहात यावेत यासाठी सातत्याने प्रबोधन.) व गायत्री सावजी,जि. बुलडाणा ( बुलडाणा जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी आरोग्य शिबीर, शेतकरी आत्महत्त्या, गर्भपात या विषयावर समाजप्रबोधनपर व्याख्याने आयोजन, मुलींसाठी दशा व दिशा यावर मार्गदर्शन)

तर क्रीडा पुरस्कार - 'युवक व युवती' क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हर्षद राव, पुणे (गिर्यारोहण – लडाख ६०१० यशस्वी चढाई, वयाच्या १९ व्या वर्षी माउंट एवरेस्टवर विजय ) व निकिता पवार, उस्मानाबाद, (खो खो - राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पारितोषिके ) यांना जाहीर झाले आहे. मानसी जोशी ( पॅरा बॅडमिंटन : जागतिक स्पर्धेत रौप्य पदक व कास्य पदक पारितोषिके ) यांना 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विशेष युवा क्रिडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रु. रोख, व सन्मानपत्र असे आहे. तर विशेष युवा क्रीडा पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे आहे. यंदाचे हे पुरस्काराचे २४ वे वर्ष आहे.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft