अण्णासाहेब शिंदे यांची जन्मशताब्दी विशेष कार्यक्रम संपन्न...

1 28 2021 9 10 32 AM

प्रतिष्ठानच्या वतीने अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत त्यावेळी प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रियाताई सुळे यांना अण्णासाहेबांच्या आठवणीना उजाळा दिला. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर महाराष्ट्रातील शेती विषयी विचार मांडतील, बाळासाहेब थोरात हे 'अण्णासाहेब शिंदे व भारतीय शेती', गोकुळ पटनाईक हे 'भारतीय शेती विषयक मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सबंध वर्षांत विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या संकल्पनेची शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. 'केंद्रात अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा व दृष्टीचा ठसा उमटवला. संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं व या क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यात सहभागी करून घेतलं. देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं', असे शरद पवार म्हणाले.
कार्यक्रमाची ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://fb.watch/3hWPWGMKKx/

माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे
यांच्या
जन्मशताब्दी विशेष कार्यक्रम...

event 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर महाराष्ट्रातील शेती विषयी विचार मांडतील. बाळासाहेब थोरात हे 'अण्णासाहेब शिंदे व भारतीय शेती', गोकुळ पटनाईक हे 'भारतीय शेती विषयक मार्गदर्शन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदराव पवार हे केंद्रीय कृषी मंत्री नात्याने त्यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीतील अनुभव, अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्व व त्यांचे भारतीय शेतीला योगदान. अनिल शिंदे हे समारोपवजा भाषण करतील. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हवर ( https://www.facebook.com/ycp100) वर पाहू शकता.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft