विज्ञानगंगाचे एकोणसाठावे पुष्प...
विज्ञानाचा विकास ( Evolution of Science )

VIDNANGANGA 160420211

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील एकोणसाठावे पुष्प शुक्रवार, १६ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ प्रा. डॉ. मयांक वाहिया हे "विज्ञानाचा विकास" ( Evolution of Science ) या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान गुंफणार आहेत. ह्या व्याख्यानामध्ये झूम आणि फेसबुक लाईव्ह (https://facebook.com/ycp100) या दोनपैकी एका माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होता येईल. व्याख्यानामध्ये सहभागी होणा-या श्रोत्यांनी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर आपले नाव, मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण अशी ईमेल पाठवावी म्हणजे वेबिनार सुरु होण्याच्या एक तास पूर्वी आपणास झूम (ZOOM) आयडी व पासवर्ड आपल्या ईमेलवर पाठवला जाईल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. आयोजित
संविधान परिचय वर्ग दिनांक ११ एप्रिल २०२१ पासून..
सत्रे १५ | प्रत्येक सत्र २ तास | प्रत्येक रविवारी ३ सत्रे |
एकूण ५ रविवार | वेळ : स. ११ ते सायं. ६

constitution APRIL1

आपला देश लोकशाही गणराज्य आहे. म्हणजेच आपण सर्व नागरिक आपले प्रतिनिधी निवडून त्यांच्यातर्फे त्याचा कारभार करत असतो. आपल्या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवातच ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी केलेली आहे. राज्यकारभार कसा चालवावा एवढेच नव्हे, तर तो काय उद्दिष्टांनी चालवावा याचे दिग्दर्शन संविधानात आहे. त्यामुळे सजग नागरिकत्वासाठी संविधानातील किमान मूल्ये व सूत्रे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या नागरिकत्वाची ती पूर्वअट आहे. यादृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना संविधानातील प्रमुख बाबींचा सुबोध परिचय करुन देण्यासाठी व या नागरिकांनी संवादक बनून इतरांना तो सुबोधपणे समजावण्यासाठी आम्ही हा ‘संविधान परिचय वर्ग’ सुरु करत आहोत. वर नमूद केल्याप्रमाणे तो दर रविवारी असेल. एकूम पाच रविवार हा वर्ग चालेल. एक वर्ग संपला की दुसरा वर्ग असे नियमितपणे हे वर्ग चालविण्याचा आमचा मानस आहे. सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी प्रवेश खुला आहे.
पहिल्या वर्गासाठीचे प्रवेश सुरु करत आहोत. या वर्गासाठीचे शुल्क प्रत्येकी ५०० रु. आहे. यात दोन चहा व एकवेळच्या जेवणाचा खर्च समाविष्ट आहे. वर्गाच्या शेवटी सहभागीत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रवेशासाठी गुगल फॉर्म https://cutt.ly/Cxr4EWj भरुन पाठवावा. त्यासाठी खालील ईमेल आयडी अथवा फोन क्रमांकावर संपर्क करावा. प्रत्येक वर्ग मर्यादित संख्येचा असल्याने प्रवेश मागणाऱ्या प्रत्येकास पहिल्या वर्गात प्रवेश मिळेलच असे नाही. ज्यांना पहिल्या वर्गात घेता येणार नाही, त्यांना पुढील वर्गांसाठीच्या प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात येईल.
अधिक माहिती साठी संपर्क : मनिषा खिल्लारे -९०२२७१६९१३, निलेश खानविलकर - ९८२१४३५६३६ तसेच This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it..

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft