पिकल बॉल या खेळाच्या कोर्टचे उदघाटन...

4444

“पिकलबॉल” या खेळाचा जन्म अमेरिकेतल्या सिएटलमध्ये १९६५ साली झाला. बॅडमिंटन, टेबलटेनिस आणि लॉन टेनिस या तीन खेळाच्या मिश्रणातून पिकलबॉलची निर्मिती झाली आहे. हा खेळ खेळण्यास अगदी सोपा आणि सर्वांगाला व्यायाम देणारा आहे. आज दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पिकलबॉल या खेळाचे कोर्टचे उदघाटन प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे संस्थापक सचिव तथा इंटरनॅशनल पिकलबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. सुनिल वालावलकर उपस्थित होते. या प्रसंगी YMAK SPORTS चे मकरंद येडूरकर यांनी खेळास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दोन 'अग्नि' नावाच्या पहिल्या भारतीय पॅडल तर ऋषी वैद्य यांनी जाळी भेट स्वरूपात दिली.
पिकलबॉल या खेळाचे वैशिष्ट्य असे आहे की हा खेळ वय वर्ष ८ ते ७० वयोगटातील कोणीही खेळू शकते. एक उत्तम असा सर्व प्रकारचा व्यायाम खेळाडूंना होऊ शकतो.या प्रसंगी अम्यच्युअर पिकलबॉल फेडरेशनचे सह कोषाध्यक्ष निखिल मथुरे, ऑल इंडिया फेडरेशनचे चेतन सनील, व प्रतिष्ठानच्यावतीने दत्ता बाळसराफ, अनिल पाझारे, विजय कान्हेकर, सुनील कदम, मकरंद येडूरकर, अदिती नलावडे, सुरेश पाटील,विजय कसबे, मनिषा खिल्लारे आदी उपस्थित होते. आगामी एक महिना सकाळी ६:३० ते ९:३० या वेळात हे कोर्ट सर्वांना सरावासाठी मोफत उपलब्ध असेल. १ नोव्हेंबर, २०२१ पासून सशुल्क प्रशिक्षणाची सुरुवात होईल.सराव आणि प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी सुरु आहे इच्छुकांनी (मनिषा खिल्लारे ) ०२२-२२०२८५९८ विस्तारित क्रमांक २२६ संपर्क साधावा.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft