banner

शैक्षणिक क्षेत्रात कायदेपंडित झाले. पण त्याचा उपयोग कधीच त्यांनी खटले लढवण्यासाठी केलेला नाही. यातून उभं आयुष्य सामान्य माणसांच्या प्रश्नांची वकिली करण्याचे काम केले. शेतीही महत्त्वाची आहे. त्यात बदल करण्याचा विचार त्यांनी मांडला. यात अनेक संधी उभारण्याचे काम केलं. त्यासाठी कृषी औद्योगिक समाजाची निर्मिती करण्याचा विचार त्यांनी दिला. त्यासोबतच त्यांच्याभोवती अनेक विचारवंतांचा वर्ग असायचा. त्यातून सुसंस्कृत समाज उभारण्याचे काम त्यांनी केले होते. चीनसारखं संकट देशात आल्यावर नाउमेद झालेली जनता पाहून देशात पुन्हा एकदा मनोधैर्य वाढवण्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेतली आणि राज्यातील सत्ता सोडून केंद्रात जाण्याची भूमिका घेतली. इतकेच नाही तर त्याहून अनेक विभागात आपल्या मोलाच्या कामगिरीचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांची प्रेरणा घेऊन आपण आपली पुढील वाटचाल करू असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जयंत लेले यांच्या ‘यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन – भारत: समाज आणि राजकारण’या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस शरद काळे, डॉ. अनिल काकोडकर, अरुण गुजराथी, जयंत लेले, प्रदीप चंपानेरकर  ,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे कोषाध्यक्ष हेमंत टकले उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft