banner

दिव्यांग वधूवरांच्या नोंदणी अभियान....

गेली सोळा वर्षे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अपंग हक्क विकास मंच, दिव्यांगांच्या हक्क, अधिकार आणि कल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग धोरण निर्मितीला चालना मिळाली. मंचाच्या अनेक उपक्रमांमधून आपली भेट होतच असते.
यावर्षी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा ऐंशीवा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आणि जागतिक दिव्यांग दिनाचे औचीत्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या सहकार्याने आज मी दिव्यांग वधूवरांच्या नोंदणीचे अभियान सुरु करत आहे. खाली दिलेल्या लिंकवर इच्छुक वधूवरांनी आपली माहिती नोंदवावी. हि नोंदणी पूर्णतः मोफत आहे.
https://forms.gle/HBjjdXk5wESTcwrR6
या लिंकवर आपली माहिती भरावी. लवकरच या उपक्रमाच्या पुढील नियोजनाची घोषणा केली जाईल.
ही माहिती आणि लिंक अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती आणि कुटुंबियांपर्यंत पोहोचवून या उपक्रमाचा लाभ अनेकांना व्हावा या साठी प्रयत्न करावे, अशी नम्र विनंती.
आपली,
सुप्रिया सुळे
अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे.
जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे ४११०२७
फोन. नं. ०२० २९५ ११ ९३१
मो. ९२८ ४७९ ४८४७

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft