banner

शरदराव पवार, शर्मिला टागोर, जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन
१७ जानेवारीपासून ६५ आंतरराष्ट्रीय चित्रपटांची रसिकांना पर्वणी

WhatsApp Image 2020 01 13 at 3.32.19 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या १० व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदराव पवार आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते १७ जानेवारी २०२० या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होणार आहे. यावेळी अभिनेत्री शर्मिला टागोर यांची विशेष उपस्थिती राहणार असून त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. यावेळी या महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल, प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई आदी मान्यवरदेखील उपस्थित राहतील. आतापर्यंत रमेश सिप्पी, पंकज कपूर, अनूपम खेर, वहिदा रेहमान, श्याम बेनेगल सारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे.
यंदा या महोत्सवात चित्रपट रसिकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध भाषांमधील निवडक ६५ चित्रपट प्रदर्शित होतील. १९ जानेवारीला स्मिता पाटील स्मृती व्याख्यानात अभिनेत्री विद्या बालन या विचार व्यक्त करतील. १७ ते २३ जानेवारी दरम्यान मुंबईकरांना जगभारतील विविध भाषातील नावाजलेले चित्रपट पाहता येणार आहे. भारत, चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.
महोत्सवामध्ये ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टीव्ह, इंडियन सिनेमा, कंट्री फोकस आणि मराठी सिनेमा इत्यादी प्रकारचे सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी श्री. अतुल यांच्याशी ०२२-२२०२८५९८ वर संपर्क साधावा अथवा ऑनलाईन नोंदणीसाठीwww.yiffonline.comसंकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

DOWNLOAD :  CATALOGUE YIFF 2020  |  SCHEDULE YIFF 2020

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft