banner

विचारकुंकू कार्यक्रमात कर्तृत्वान महिलांचा सत्कार...

82092020 1312640712277571 6961629657347129344 o


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विचारकुंकू' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विचारकुंकू कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. मा. सौ. निता देवळालकर, स्वयम पुनर्वसन केंद्र, ठाणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा असतील. कार्यक्रमामध्ये निता देवळालकर यांची मुलाखत सौ. अर्चना अडावदकर (FM GOLD Radio Jockey) घेतील. हा कार्यक्रम शनिवार १८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता, कै. रेगे सभागृह, पहिला मजला, मराठी ग्रंथसंग्रहालय, तहसिलदार कचेरी जवळ, ठाणे (प.) येथे होईल. राजेश परांजपे, पल्लवी फौजदार, मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांनी लोकांनी अधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft