banner

जिंतूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत
वैश्विक ओळखपत्र वाटप नोंदणी शिबीर..

WhatsApp Image 2019 02 21 at 18.49.20

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी यांच्यातर्फे दि. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पंचायत समिती जिंतूर ता.जिंतूर जि. परभणी येथे ‘दिव्यांगअस्मिता’ अभियानांतर्गत जिंतूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटपासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराच्या उदघाटनाला मा.श्री.आर.जी.गायकवाड(वै.शा.का.जि.प.परभणी) अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.श्री.विष्णू वैरागड (समन्वयक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)मा.श्री.शेख साहेब(गट विकास अधिकारी,जिंतूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगाना प्रातनिधिक स्वरूपात वैश्विक कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिंतूर तालुक्यातील ३६५ दिव्यांगानी वैश्विक ओळख पत्रासाठी नोंदणी केली. या कार्यक्रमासाठी जिंतूर तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व विशेष शाळेतील कर्मचारी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.श्री.ताटे सर(विशेष शिक्षक)तर आभार प्रदर्शन मा.श्री.अपुर्वा सर यांनी केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft