banner

माय-लेकींचा विभागीय केंद्र परभणी तर्फे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरवपरभणी : रणात उतरणा-या सैनिकांना प्रेरणा देणारे दोन व्यक्तीमत्त्व मां. जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्राच्या उत्थानासाठी जीवन समर्पित आहे. जिजाऊची लेखक म्हणून मला सतत प्रेरणा आहे. तर एका पर्वाचे स्वामी विवेकानंद माझे वाचनाचे विषय आहे. जगप्रवास करून स्वामी विवेकानंदांनी एकट्याने परदेशात भारतीय संस्कृती-धर्म जागृत ठेवला. जिजाऊ ही वृत्ती आहे. लेकरं घडविण्याची वृत्ती, असे प्रतिपादन कवी इंद्रजित भालेराव यांनी 'जागर मायलेकिचा' कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणीच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. संध्या दुधगावकर, यांच्यासह जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षा सौ. भावना नखाते, कृषीभूषण सोपानराव, अनिल जैन, विलास पानखेडे, सुमंत वाघ, विमल नखाते, अरूण चव्हाळ, विष्णू वैरागर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम नूकताच संपन्न झाला.

प्रारंभी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक विलास पानखेडे यांनी केले. प्रख्यात गायक प्रा. डॉ. अशोक जोंधळे यांनी जिजाऊ वंदनगीत सादर केले. तर सुप्रसिध्द गायिका आशाताई जोंधळे यांनी एकुतली 'एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक' हे प्रेरणागीत सुंदर आवाजात गायन केले. जागर मायलेकिंचा कार्यक्रमांर्गत कठीण परिस्थितीचे झुंज देत जीवनात यशस्वी ठरलेल्या वर्तमान काळातील मायलेकींचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने स्मृतीचिन्ह, पुस्तके भेट देऊन करण्यात आला.

ज्योती गवते, लक्ष्मी गवते (क्रीडा क्षेत्र), अनुराधा पंडीत (नृत्यकला), सोनी राऊत, सुमन राऊत (मंत्रालय, मुंबई), आरती आरबाड, रंजना आरबाड (शिक्षण), तृप्ती ढेरे, शकुंतला ढेरे (लोककला व प्रशासन), डॉ. श्रृती कदम (वैद्यकीय सेवा), खान (न्याय व्यवस्था), जागृती नामदेव देशमुख, शालिनी देशमुख (न्याय संस्था), श्र्वेता यादव, सुशिला काळे (प्रशासन अधिकारी), डॉ. कल्पना डोबे, रंजना डोंबे (वैद्यकीय सेवा), पूजा कुटे, संजीवनी कुटे (पोस्ट खाते), या मायलेकीचा सन्मान टाळ्यांच्या गजरात करण्यात आला. प्रमुख पाहूण्या भावना नखाते यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षणीय समारोप करताना डॉ. संध्या दुधगावकर यांनी महामानवाच्या वृत्तीने वर्तमान पारतंत्र्याला नाहीसे करा, येणा-या आव्हानाला भिडून पुढे जावे. प्रत्येकाने संवेदनशीलता जिवंत ठेऊन आपले जीवन यशस्वी करावे. अस्मिता धगधग बाजूला ठेऊन आव्हाने पेलावीत, असे मत मांडले. 'काळाचे संदर्भ तपासून महामानवाच्या विचाराने अनेक गोष्टीला सामोरे जावे. त्यांच्या संस्कारातून आचारवंत व्हावे असे डॉ. दुधगावकर म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऐश्र्वर्या फुलारी तर उपस्थितांचे आभार सौरभ फटाफुळे यांनी व्यक्त केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft