banner

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभाग केंद्रा तर्फे त्रैमासिक सभा..आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभाग केंद्र याची त्रैमासिक सभा श्रीनिवास रेसिडेंसी, बदलापूर येथे पार पडली. प्रतिष्ठानच्या आत्तापर्यंतच्या कामाचा आढावा घेण्यात आला व पुढील काळातील महत्त्वपूर्ण आखणी करण्यात आली. त्यासाठी पुढील ३ महिन्यांच्या कामांचे नियोजन करण्यात आले. मा. राजा भाऊ लिमये यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. तर प्रतिष्ठानचे मा. दत्ता बाळसराफ, पालघर जिल्हा संघटक बाबा कदम, रायगड जिल्हा संघटक अभिजित देशमुख, बेलोसे मॅडम, रेडीज मॅडप आदी मान्यवर उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft