banner

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक तर्फ
‘ऋतुस्पर्श’ ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन...

WhatsApp Image 2021 03 09 at 12.23.41 PM

नाशिक : महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 108व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला ख्यातनाम लेखिका दुर्गा भागवत व अरूणा ढेरे यांच्या ‘ऋतुचक्र’ व ‘रूपोत्सव’ या पुस्तकातील निवडक लेखांचे अभिवाचन करण्यात येणार आहे. ‘ऋतुस्पर्श’ या शीर्षकाने घेणार्‍या या कार्यक्रमात अपर्णा क्षेमकल्याणी व अभिनेत्री सई मोने-पाटील अभिवाचन करणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.11 मार्च 2021 रोजी सायं.5.00 वाजता Facebookpage@ycpnashik यावर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
ऋतू आणि जीवन व्यवहार यांचा अनोखा संबंध आहे. जगण्यातील आनंद, उत्सव हे ऋतुंशी निगडीत आहेत. त्यातून सर्जनाची जाणीव निर्माण होते. या सुत्राचा वेध घेणारी ही अभिजात पुस्तके अनेक वर्षे रसिकांनी जपली आहेत. तरी जास्तीतजास्त संख्येने हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा यांनी केले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft