banner

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिकचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने म्हणाले की,भाषा ही माणसांमधील पूल आहे. त्यातून माणूस जोडण्याचे काम होते. एकमेकांविषयी आपुलकी, विश्वास निर्माण होतो. भाषा ही आईसारखीच असून ती प्रेम, वात्सल्य यांचा अनोखा मिलाफ आहे. मराठी, हिंदी, उर्दू यांच्या समन्वयातून जीवनाचा नवा अर्थ रसिकांना सापडत असतो. अनेक शायरांनी एकात्मभावाची, समाजनतेची शिकवण दिली व नवा विचार दिला. यावेळी श्री. कडासने यांनी उर्दू, हिंदी भाषेच्या बंधूत्वाची ओळख विविध शेर व कवितांतून करून दिली आणि रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. सुनिल कडासने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधिक्षक यांचा परिचय डॉ. हरीभाऊ कुलकर्णी यांनी केला. सुनिल कडासने यांचा सन्मान बी. एस. एन. एल. चे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केला. प्रदीप निफाडकर यांचा परिचय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिकचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला. तसेच प्रदीप निफाडकर यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांच्या हस्ते करण्यात आला. मा. डॉ. सुभाष पवार यांचा सन्मान प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास कार्यक्रमास विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, प्रतिष्ठानचे सदस्य नितीन ठाकरे, बी. एस. एन. एल. चे महाप्रबंधक नितीन महाजन, विश्वास बँकेचे संचालक विक्रम उगले, डॉ. वासुदेव भेंडे, विश्वास को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, कवी संजय चौधरी, नरेश महाजन, सोमनाथ साखरे, सुशिला संकलेचा, अश्विनी बोरस्ते, अ‍ॅड. मिलींद चिंधडे, विलास पंचभाई, रघुनाथ साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft