banner

चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठीदि ट्रेन

WhatsApp Image 2020 02 29 at 5.36.11 PM

नाशिक (दि. २८) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक जॉन फ्रँकनहायमर व आर्थर पेन यांचा दि ट्रेनहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
दि ट्रेन हा अमेरिकन युद्धपट असून रोझ वॅलँड लिखीत ले फ्रंट डीलार्टया सुप्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. आधुनिक चित्रकलेतील अभिजात चित्रांचा खजिना जर्मनीला पाठवण्याची तयारी सुरु असते. परंतु,त्यासाठी सदर रेल्वे काही काळासाठी उशिरा पाठविण्याची गरज आहे. परंतु, हा निर्णय चित्रे नेण्यासाठी धोकादायक ठरू शकतो का? इतक्या महत्त्वाच्या कलाकृतींचा पुढील प्रवास कसा होतो, अ‍ॅक्शन, थरारक प्रसंग, संवाद यांचा प्रभावी वापर या युद्धपटात करण्यात आला आहे. जर्मनीतील सामाजिक, सांस्कृतिक संदर्भाची जाणीव येथे समोर येते. १९६४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपटाचा कालावधी १४० मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मानद अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft