banner


उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय टायगरमॅन ह्या ट्रायथलॉन स्पर्धेत वयाच्या ६४ व्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. सुभाष पवार यांचा सन्मान विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इस्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केला. मधूरा बेळे यांचा सन्मान डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांनी केला. रसिक कुलकर्णी यांचा सन्मान ओझर मर्चंट बँकेचे संचालक रत्नाकर कदम तर संस्कार जानोरकर यांचा सन्मान राहूल फाटे यांनी केला. स्वराली जोगळेकर यांचा सन्मान माधवबागच्या आरोग्य समन्वयक मार्केटींग हेड मधुरा गुर्जर-वाणी यांनी केला. पंडित अविराज तायडे यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पंडित अविराज तायडे म्हणाले की, सूरविश्वास म्हणजे स्वरांचा यज्ञ असून त्या माध्यमातून अनेक प्रतिभावंत कलावंतांना त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळत आहे. त्यासाठी सर्वांनी कानसेन म्हणून आपले योगदान द्यावे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft