banner

संगीतातील प्रयोगशील अभ्यासासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच गानवर्धन संस्थेतर्फे यमुनादेवी शहाणे शास्त्रीय संगीत शिष्यवृत्ती मिळाली आहे. भारतात अनेक ठिकाणी मैफिलीत गायन करत असतात. त्यात नेहरु सेंटर, मुंबईतर्फे कल की खोजमैफल, मल्हार महोत्सव, पारनेर महाराज संगीत महोत्सव, ऋग्वेद तबला अकादमीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव, गोपीकृष्ण महोत्सव तसेच अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले असून त्यात मेलडी क्वीन सन्मान, पं. हृदयनाथ मंगेशकर सन्मान, नादब्रह्म सन्मान, सुर-साधना सन्मान, देशदूत गुणवंत पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी ईशान संगीत अकादमी स्थापन केली असून शास्त्रीय संगीतात रुची असणार्‍या गायकांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft