banner

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे कविसंमेलनात
जगण्याचे विविध आविष्कार सादर

WhatsApp Image 2020 01 25 at 8.12.37 PM
नाशिक (दि. २५) बदलतं वास्तव आणि जगण्याचा संघर्ष देशप्रेम, गझल, लावणी अशा विविध विषयांवर दर्जेदार कवितांनी कविसंमेलनात रंग भरला जीवन किती वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी, क्षणांनी भरलेले असते. त्याची अनोखी अभिव्यक्ती कवितांमधून कवींनी पेश केली. बालकवी ते ज्येष्ठ कवी असे ७० हून अधिक कवी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, यांच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिक जिल्ह्यातील कवी तसेच कवीवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा, नाशिक कवी, काव्य मंच, नाशिक, माझी कविता परिवार, संवाद नाशिक व डे ला आर्टेस्टा, नाशिक साहित्य कणा फाऊंडेशन या संस्था सहभागी झाल्या होत्या.
कवी संमेलनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिकचे विश्वस्त अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. बोलताना ते म्हणाले, की 'कविता ही अनेक अर्थानी अनुभवांनी समाजाला नवा विचार देत असते आणि त्यातून समाज परिवर्तन होत असते.
बालकवयित्री तनिष्का सहाणे यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व विषद केले. 
थोर पुरुषांमुळे मिळाले आपल्याला स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे स्वप्न झाले साकार तेव्हाच इंग्रजांनी घेतली माघार
कवी सुभाष सबनीस यांनी लावणी आणि अभंगांचे वेगळेपण मांडले
लावणीला भुलुन
अभंग झुराया लागला
दिवे लागणीला पेले
रिचवायला लागला
कवी अजय जाधवने प्रेम आणि आसक्ती याची जाणीव अलवारपणे व्यक्त केली.
तिच्या आठवणींना तुझ्या
कवितांचा आधार
परत जाताना तुला
आठवण्याचा आधार दे
कवी राजेंद्र उगले यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने संमेलनात चांगलीच रंगत आणली. नितीन ठाकरे व राजेंद्र उगले यांचा सन्मान विश्वास बँकेचे महाप्रबंधक रमेश बागुल यांनी केला वेदांशू पाटील यांनी प्रास्ताविक केले. कविसंमेलनात संजय चौधरी यांच्या गोपाळकाला कवितेने दाद मिळवली. दयाराम गीलान कर राज शेळके, विजय जोर्वेकर, रूपंम बिरारी, राधाकृष्ण साळुंके, नंदकिशोर ठोंबरे, अजय बिरारी, वैशाली शिंदे, संजय गोरडे, अमित भामरे आदींनी कविता सादर केल्या.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft