banner

रक्तदान शिबिरात ११५ जणांनी केले रक्तदान....

WhatsApp Image 2021 04 25 at 4.25.39 PM

दि.२५ (औरंगाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, प्रयास युथ फाऊंडेशन यांच्या वतीने व श्री गजानन महाराज संस्थान,औरंगाबाद यांच्या विशेष सहकार्याने रविवार दि. २५ एप्रिल २०२१ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला ११५ जणांनी यात सहभाग नोंदवून रक्तदान केले. शासकीय रक्तपेढी (घाटी रुग्णालय) औरंगाबाद यांनी रक्तसंकलन केले.गजानन भवन,श्री. गजानन महाराज मंदिर,औरंगाबाद येथे हे रक्तदान शिबीर संपन्न झाले.यावेळी रक्तदान केलेल्या प्रत्येकाला भेट म्हणून झाडाचे रोप देण्यात आले.शिबीर यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे विभागीय सचिव नीलेश राऊत,संस्थानचे विश्वस्त डॉ.प्रवीण वक्ते,सुहास तेंडुलकर, प्रयासचे रवी चौधरी,शासकीय रक्तपेढीच्या सुनीता बनकर,सुबोध जाधव,मंगेश निरंतर,ज्ञानेश बोद्रे,उल्हास बाबरे,पल्लवी मुथा,शिल्पा बाबरे,सचिन दराडे,मनोहर महाडिक,प्रकाश कुलकर्णी,श्याम पाटील, प्रियंका वाघमारे,धनेश तंटक,विजय मुंडे,लक्ष्मण हिवाले,मयूर देशपांडे, दीपक जाधव,गणेश घुले,डॉ.संदीप सिसोदे, श्रीराम पोतदार,अजय भवलकर,उदय भोसले,कृष्णा जाधव,कचरू जाधव,शिवाजी पांडव,मनोज जाधव, प्रभाकर,लिंगायत,गिरीजाराम क्षीरसागर,रतन राऊत,त्रिशूल कुलकर्णी,बाबू स्वामी,रोहन देशपांडे,रायभान जाधव,प्रदीप खडके,बाळू कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft