banner

'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण कार्यशाळा


मुंबई शहरामध्ये साधारण ४० हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या सर्व संस्थांचे काम चांगले व्हावे, यासाठी शासनाचे कायदे किंवा उपविधी लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. हाच मुख्य हेतू लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यापीठातर्फे 'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८या कालावधी मध्ये (सोमवार ते शुक्रवार) दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार असून प्रशिक्षण शुल्क ६४९०/- भरून सहभागी होता येईल. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पूर्णवेळ व अर्धवेळ नोकरी मिळविण्यासाठी सहकार्य केले जाईल असे महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे सांगण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी कृपया संजना पवार यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft