banner

कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरम याचे मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरम आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१७ राज्यव्यापी प्रबोधन अभियान व आराखडा या विषयावर आयोजीत करण्यात आलेले चर्चासत्र नूकतेच संपन्न झाले. एकदिवसीय सत्रात जात पंचायतीला मुठमाती अभियान व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यावर दृष्टीक्षेप, शासन परिपत्रक व नवीन कायद्यांनूसार दाखल गुन्ह्यांचा आढावा, सामाजीक बहिष्कार विरोधी कायद्यातील तरतूदीचा अन्वयार्थ, प्रभावी व परिणामकारक कायदा अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम व नियमावलीच्या तरतूदी आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा राज्यव्यापी प्रबोधन आंदोलन या विषयांवर चर्चा झाली.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft