शिक्षण विकास मंच

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान २००८ पासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरीता प्रयत्नशील आहे. विविध महत्वाच्या विषयावर परिषदा, कार्यशाळा, चर्चासत्रे, शिक्षणविषयक पुस्तकांचे प्रकाशन, उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथांना पुरस्कार, शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय शिक्षणदिनाचे आयोजन, शैक्षणिक महत्वाच्या विषयावर होणारी ‘शिक्षण कट्टा’ यावरील चर्चा, दत्तक शाळा, शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशिक्षण अशा विविध पातळीवर हा मंच कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक, संस्था चालक, शासकीय अधिकारी, अभ्यासक, माध्यम प्रतिनिधी, पालक तसेच विद्यार्थी यांनी एकत्र साधक बाधक चर्चा करावी याकरीता शिक्षण विकास मंचाचे व्यासपीठ उपलब्ध आहे. शिक्षण विकास मंचच्या स्थापनेपासून डॉ. कुमुदबन्सल यांचे मार्गदर्शन उपक्रमांना लाभले. डॉ. वसंत काळपांडे शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक म्हणून काम पाहत आहेत.

शिक्षण विकास मंचाची भूमिका

बिगर इंग्रजी माध्यमाच्या ग्रामीण भागतील शाळा, स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळा यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा अधिक मदतीची गरज आहे. आर्थिक मदत तर आवश्यक आहेच, पण त्याहूनही अधिक आहे ती आपली कोणीतरी दखल घेते या जाणिवेची, चांगल्या कामाचे कोणीतरी कौतुक करुन प्रोत्साहन देण्याची आणि चांगले काम करणा-या शिक्षकांना एकत्र आणण्याची. चांगले काम करणा-यांना एकच बक्षिस आवडते, ते म्हणजे अधिक चांगले काम करण्याची संधी. हे घडवून आणण्यासाठी शिक्षण विकास मंच उत्प्रेरकाची (catalyst ची) भूमिका बजावत असतो. शिक्षण क्षेत्रात काम करणा-या व्यक्तिंना शिक्षण विकास मंच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणून त्यांचे अनुभव, कल्पना यांची देवाणघेवाण घडवून आणत असतो.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft