व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प....
फिनलंड जगाकडून काय शिकला?

banner 26122020

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सर्व शिक्षणप्रेमींसाठी "देशोदेशीच्या शिक्षणपद्धती" या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प शनिवार, २६ डिसेंबर २०२० रोजी फिनलंडच्या शिक्षणपद्धतीचे अभ्यासक डॉ. हेरंब कुलकर्णी आणि डॉ. शिरीन कुलकर्णी "फिनलंड जगाकडून काय शिकला?" याविषयावर गुंफणार आहेत. झूम मीटिंग आणि फेसबुक लाईव्ह (ycp100) या दोनपैकी एका माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होता येईल. इच्छुक शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी माधव सूर्यवंशी यांच्याकडे 9967546498 या क्रमांकावर आपली नाव, राहण्याचे ठिकाण, व्हाट्सअँप क्रमांक, व्यवसाय ही माहिती पाठवावी. झूमवर 100 एवढीच क्षमता असल्यामुळे सर्व इच्छुकांना तिथे सामावून घेता येणार नाही. ज्यांना झूमवर सामावून घेता येणार नाही त्यांनी फेसबुक लाईव्हवर हा कार्यक्रम पहावा, अशी नम्र विनंती आहे. ही सर्व व्याख्याने https://www.youtube.com/c/YashwantraoChavanPratishthan/featured या युट्युब चॅनेलवरही टाकण्यात येईल. त्यामुळे ज्यांना या विषयात रस आहे, ते आपल्या सवडीनुसार ही व्याख्याने ऐकू/पाहू शकतील.
- डॉ. वसंत काळपांडे, मुख्य संयोजक, शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

"देशोदेशीच्या शिक्षणपद्धती" पहिले व्याख्यान संपन्न...

WhatsApp Image 2020 12 19 at 6.52.53 PM 1


शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सर्व शिक्षणप्रेमींसाठी देशोदेशीच्या शिक्षणपद्धती या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प १९ डिसेंबर २०२० रोजी शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी देशोदेशीचं शिक्षण - तुलनेची गरज आणि अडचणी याविषयावर मांडणी करून गुंफले आहे. देशोदेशीच्या शिक्षणपद्धतीची तुलना करावी पण करताना त्याचा हेतू आणि साध्य (goal) निश्चित करावे. हे सांगताना त्यांनी हंटर कमिशनचे उदाहरण दिले.तुलनात्मक विचाराचा फायदा आहे यामुळे आपणांस एक दिशा मिळते मात्र या तुलनेचा परिणाम विद्यार्थ्यावर होऊ नये,असे मत व्यक्त केले. व्याख्यानाच्या सुरूवातीस बसंती रॉय यांनी शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या कार्याचा परिचय करून दिला. ही व्याख्यानमाला का आयोजित केली,त्याचा हेतू काय आहे,त्याची गरज आणि मर्यादा काय आहेत ..?शिक्षणपद्धतीवर त्या देशाच्या पर्यावरणीय बदलाचा काय परिणाम होतो याचे विवेचन डाॅ.वसंत काळपांडे यांनी केले.समारोपात माधव सूर्यवंशी यांनी परदेशातून,देशातून ,राज्यातून या व्याख्यानास उपस्थित असणाऱ्या सदस्यांचे आभार मानले.या कार्यक्रमात झुम व फेसबुकवरून 7,125 people,683 Engagements नी online स्वरूपात सहभाग घेतला. हे व्याख्यान पाहण्यासाठी : https://www.youtube.com/watch?v=GTE-_D0zG_0

 

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft