"आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत" या विषयावर चर्चासत्र...

education 03082021 BANNER

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना मुले शाळेत जाण्यासाठी आतूर झाली आहेत. समाजमनही शाळा सुरू करण्यासंदर्भात आग्रही आहे.युनिसेफ,युनिस्को आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने शाळा पुन्हा सुरू कराव्यात,जास्त काळ मुलांना शाळेपासून दूर ठेवणे त्यांच्या मानसिक व शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही असे मत नोंदविले आहे. जनजीवन बऱ्याच प्रमाणात सुरळीतपणे सुरू आहे. मुले गटागटांत खेळत आहेत. मात्र गेली दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे शैक्षणिक मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच अंगांनी नुकसान झाले आहेत. लक्षावधी मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडली आहेत. हे नुकसान टाळण्यासाठी शाळा लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजेत. शिक्षण विभागाने केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त पालकांनी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असे सांगितले आहे.

या विषयावर शिक्षण संवाद घडवून आणण्यासाठी मंगळवार , दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ४.००ते ६.०० या कालावधीत शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी यांच्यासाठी एका online शिक्षणकट्टयाचे आयोजन करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय शिक्षण कट्टयामध्ये शिक्षक,पालक,शिक्षणतज्ज्ञ,संस्थाचालक यांच्याकडून आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत या विषयावरील मुद्दे मांडण्यात येतील. फेसबुक लाईव्ह माध्यमातून Yashwantrao Chavan Pratishthanच्या फेसबुक पेजवर ycp100 या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

अतिरिक्त माहितीसाठी डॉ. माधव सूर्यवंशी यांच्याशी 9967546498वर संपर्क साधावा.

- डॉ. वसंत काळपांडे, मुख्य संयोजक, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft