शिक्षण कट्ट्यावर ‘खाजगी कोचिंग क्लासेस’ विषयावर चर्चाशिक्षणप्रेमींनी शिक्षणासाठी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच ‘शिक्षण कट्टा’. शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांनासोबत घेऊन हा शिक्षणकट्टा गेली सहा वर्ष सुरु आहे. यावेळी हा कट्टा शनिवार दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजी दुपारी २ वाजता, बोर्ड रूम, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘खाजगी कोचिंग क्लासेस’ या विषयावर चर्चा होणार आहे. खाजगी कोचिंग क्लासेस, टेस्ट सिरीज, गृह शिकवणी, ऑनलाईन क्लासेस यासारख्या इतर समांतर शिक्षण व्यवस्था आज अस्तित्वात आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून खाजगी शिकवणी वर्ग अधिनियम तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. या सर्व मुद्यांवर सदर कट्ट्यावर चर्चा होईल.शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे आणि बसंती रॉय यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपले विचार मांडावेत ही विनंती. संपर्क – माधव सूर्यवंशी ९९६७५४६४९८

  शिक्षण कट्टा..

शिक्षण कट्ट्याचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.पहिला टप्पा मात्र संपलेला नाही; मुंबईचा शिक्षण कट्टा सुरु राहणारच आहे. मुंबई बरोबरच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे, नाशिक, रत्नागिरी, कराड, औरंगाबाद, लातूर, नागपूर आणि अमरावती या विभागीय केंद्रांच्या ठिकाणी सुध्दा शिक्षण कट्टे सुरु होत आहेत. पुणे आणि औरंगाबाद इथे सुरुवात झाली सुध्दा. या सर्व ठिकाणी लोक स्वखर्चाने शिक्षण कट्ट्यांमधील चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी आपला वेळ देतात. आमच्या वेळचे शिक्षक कसेचांगले होते; आजकाल शिक्षकांमध्ये कामाबद्दल निष्ठाच राहिली नाही, असे वारंवार ऐकू येते. हे सपशेल खोटे ठरवणारे हजारो अनुभव आम्हाला शिक्षणकट्ट्याच्याच नाही तर इतरही सर्वच कार्यक्रमांच्या निमित्ताने येत असतात.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft