अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी जिएसटी प्रणाली आजही व्हेटीलेटरवर
                                                           –
प्रा. डॉ. अजित जोशी

IMG 20191230 WA0013

आर्थिक मंदिची सुरुवात २०१६ च्या सुरुवातीपासून झाली, आसा स्टेट बँकेचा दावा आहे. सरकारने नोटाबंदी केली, मात्र त्याचा परिणाम काय झाला हे आजही माहित नाही. तज्ञांचे सल्ले घेतले नसल्याने धोरणात त्रृटी दिसल्या, हे सिद्ध झाल आहे. काळा पैसा बाहेर आला नाही, भ्रष्टाचार थांबला नाही, या धोरणामुळे असंघटित क्षेत्राच्या गुडघ्याच्या वाट्या फोडल्या गेल्या. श्रीमंतांच नुकसान झाल नाही, मात्र गरिबांना घायाळ केल. उद्योजकांच्या धोका उचलण्याच्या वृत्तीला धक्का बसला, असे प्रतिपादन सीए डॉ. अजित जोशी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारक सभागृह येथे आयोजित 'राजकीय अर्थकारणाचे परिणामया विषयावरील व्याख्यानात डॉ. जोशी बोलत होते. व्यासपीठावर सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सोलापूरचे अध्यक्ष युनूस, कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे, चेंबर चे अध्यक्ष राजू राठी, राजगोपाल उपस्थित होते. श्री शिवदारे यांनी प्रास्ताविक केले. दिनेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. जोशी म्हणाले, आर्थिक क्षेत्रात जगातील अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात महिला मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. ७० व्या दशकात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्टीयीकरण केले. तेव्हा बँकात स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर नोक-या मिळाल्या. कालांतराने स्त्रिया आज बँकांच्या मुख्य पदांवर आहेत. हे राजकीय अर्थकारणाचे उत्तम उदाहरण आहे.
नोटाबंदी झाल्यानंतर शेती, उद्योग तसेच असंघटित क्षेत्रातील रोजगारांवर गदा आली. नोटाबंदीचा निर्णय थेटपणे लागू करणे अत्यंत चुकीचे ठरले. नोटाबंदीप्रमाणेच जीएसटी लागू करतानाही सरकरकडून घाई झाली. यातूनच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, असे त्यांनी सांगितले.

WhatsApp Image 2019 10 23 at 2.53.49 PM

 

_____________________________


 चार्ली चॅप्लिन एक महान कलावंत

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर आयोजित चार्ली चॅप्लिन एक महान कलावंतचार्ली चॅप्लिन यांच्या विनोदाचं तत्व शनिवार २६ ऑक्टोबर २०१९, सायंकाळी ६ वाजता, अॅम्पी थिएटर, हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे दाखवलं जाणार आहे. त्यातून त्यांच्या विविध छटांवर भाष्य केले जाणार आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.

  _____________________________

   

विभागीय केंद्र - सोलापूर

श्री.धर्मण्णा मो. सादूल, अध्यक्ष
 श्री. राजशेखर वि. शिवदारे, कोषाध्यक्ष
 श्री. दिनेश दे. शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft