विडी वळणाऱ्या महिलासाठी पुरक उद्योग गरजेचा – धर्मण्णा सादुल

IMG 20190511 WA0065

धूम्रपान कायदा कडक झाल्यामुळे विडी वळणाऱ्या महिलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भविष्यात बिकट होणार आहे त्यामुळे लवकरच त्यांच्यासाठी पुरक उद्योग सुरु करणे गरजेचे असून त्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची गरज आहे असे प्रतिपादन माजी खासदार धर्मण्णा सादुल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त यशवतराव चव्हाण प्रतिष्ठान मुबई विभागीय केंद्र सोलापूर आयोजित विडी वळणाऱ्या महिलाच्या मेळाव्यात ते बोलत होते प्रथम यशवतराव चव्हाण याच्या प्रतिमेचे पूजन श्री धर्मण्णा सादूल, श्री जनार्धन कारमपुरी डॉ. गोवर्धन सुचु, श्री अप्पाशा म्हेत्रे याच्या हस्ते करण्यात आले प्रतिष्ठानचे सचिव दिनेश शिदे यानी मेळाव्या आयोजना मागील भूमिका विषद केली कामगार नेते डॉ गोवर्धन सुंचू यांनी विडी उद्योग आणि यावर अवलबुन असणाऱ्या महिला कामगाराच्या अडचणी मांडल्या.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी महापौर जनार्धन कारमपुरी यांनी वस्त्र उद्योग हा पुरक व्यवसाय असून त्याचे प्रशिक्षण प्रथम या महिलांना देणे गरजेचे आहे त्यासाठी मी आणि धर्मण्णा सादुल साहेब सयुक्त प्रयत्न करू यासाठी सुप्रियाताई सुळे यांची मदत घेतली जाणार असल्याचे सागितले. याप्रसंगी यशवतराव चव्हाण प्रतिष्ठान वतीने मान्यवराचे हस्ते महिला कामगाराना साडी भेट देण्यात आली सुमारे ३०० महिला या मेळाव्यास उपस्थित होते.

सतीश दासरी,सत्यनारायण बल्ला ,नागनाथ भंडारी ,अबिका गदास ,विजया आडप, राधा याल्दंडी ,व्यंकटेश कुरापती ,महेश्वरी सामलेटी ,लक्ष्मीं मंडल अबंना सायपूर यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र निर्माण करण्याची क्षमता फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामध्येच होती
- प्रा.राजेंद्र दास

IMG 20190313 WA0037

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर आणि श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजकारणा पेक्षा समाजकारणात त्यांनी जास्त लक्ष घातले. जातीच्या कोणत्याच कप्प्यात ते अडकले नाहीत. राजकारणाचा, सत्तेचाउपयोग सामान्यांना कसा होईल यावर त्यांचा भर होता. प्रशासन, शिक्षण, सहकार, ग्रामीण महाराष्ट्र, उद्योग व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रात ते महाराष्ट्राचा विकास पाहत होते त्याचबरोबर साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे त्यामुळे तरूण पिढीने यशवंतराव चव्हाण कोण होते हे जाणून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र दास यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ विचारवंत मनोहरपंत धोगडे व प्रमुख पाहुणे म्हणुन विभागीय केंद्राचे सदस्य राहुल शहा उपस्थित होते तसेच प्राचार्य पवार यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

श्री.धर्मण्णा मो. सादूल, अध्यक्ष
 श्री. राजशेखर वि. शिवदारे, कोषाध्यक्ष
 श्री. दिनेश दे. शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft