कायदेविषयक एकदिवशीय व्याख्यानमाला...

solapur


सोलापूर १२ : सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या सोलापूर विभाग यांच्या संयु्क्त विद्यमाने एकदिवशीय कायदेविषयक व्याख्यानमाला शनिवार १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८.३० ते ५ वाजेपर्यंत डॉ. निर्मलकुमार फडकुलक सभागृह सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे होणार आहे. उद्घाटन मृनालिनी फडणीस, (कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) तसेच सोलापूर केंद्राचे अध्यक्ष युन्नुसभाई शेख, प्रमुख पाहुणे प्रदिपसिह रजपूत (जिल्हा सरकारी वकील)उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख व्याख्याते अँड. डॉ. सुधाकर आव्हाड, अँड डॉ. मकरंद आडकर, अँड. डॉ. राजेंद्र अनुभुले असणार आहेत. सर्वांना या व्याख्यानमालेचा सहभाग नोंदवा असे आयोजकातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

जल जन जागर लोक संवाद कार्यशाळा

भूपृष्ठावरील जलसाठे कार्यशाळा

8 12 2019 3 02 33 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूरच्या वतीने भूपृष्ठावरील जलसाठे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन रविवार दि.२८ जुलै २०१९ रोजी मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी जलतज्ञ श्री अप्पासाहेब पुजारी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन जल संपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री सी ए बिराजदार यांनी केले. विभागीय केंद्राचे हंगामी अध्यक्ष हाजी युनुसभाई शेख, श्री धर्मण्णा सादुल सोलापुर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री संजय धनशेट्टी या उपक्रमाचे समन्वयक व दै. सकाळचे मुख्य उपसंपादक श्री रजनिश जोशी हे उपस्थित होते. 
सदर कार्यशाळेत सोलापुर जिल्ह्यातील भूपृष्ठावरील जलसाठे त्यावर अवलंबून असणारी जिल्ह्यातील सिंचनाची परिस्तिथी संपूर्ण पाणीपुरवठा, प्रदूषण व त्यावरील उपाय या विषयावर सखोल मार्गदर्शन तज्ञांनी केले व चर्चा देखील झाली. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी वॉटरग्रीडची योजना राबवावी या योजनेमुळे जिल्हा टँकरमुक्त होईल असे प्रतिपादन सी. ए. बिराजदार यांनी केले.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

श्री.धर्मण्णा मो. सादूल, अध्यक्ष
 श्री. राजशेखर वि. शिवदारे, कोषाध्यक्ष
 श्री. दिनेश दे. शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft