केंद्रीय अर्थसंकल्पात समतोल नाही – अर्थतज्ञ राजगोपाल मिनियार

IMG 20200222 WA0006

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापुर, श्रमिक पत्रकार संघ सोलापुर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर चर्चेत ज्येष्ठ लेखापरीक्षक राजगोपाल मिनियार, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र कासवा, टेक्सटाईल फाउंडेशनचे राजेश गोसकी, यंत्रमाग धारक संघाचे पेंटप्पा गडम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठी यांनी आपले विचार मांडले.
राजेंद्र कासवा यांनी GST हा विषय अर्थसंकल्पाचा भाग नाही परंतु तो किती घाइने आणला तसेच सदर कायद्याचा अर्थ एक राष्ट्र एक करप्रणाली असा असताना कोणकोणते कर आजही लागु आहेत. तसेच सदर कायद्यात होणारे सततचे बदल यामुळे होणारा त्रास यावर आपले विचार मांडले. तर राजगोपाल मिनियार यांनी सार्वजनिक न्यासा साठी घेतलेली खबरदारी योग्य कि अयोग्य तसेच करप्रणाली मध्ये केलेली दिशाभूल विषद केली. वस्त्रउद्योगासाठी सरकारच्या नव्या धोरणात कोणत्या बाबी असल्या पाहिजेत यावर विचार मांडले. तर राजु राठी यांनी तरुणांना करप्रणाली समजावून सांगितली. सदर चर्चेत व्यापारी, पत्रकार व वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

श्री.धर्मण्णा मो. सादूल, अध्यक्ष
 श्री. राजशेखर वि. शिवदारे, कोषाध्यक्ष
 श्री. दिनेश दे. शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft