सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

WhatsApp Image 2020 01 31 at 12.39.21 PM

सोलापूर दि. ३१ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर तर्फे रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील पर्जन्यमान, मान्सून आणि तदनुषंगिक विषयावर विविध मान्यवर विचार मांडतील. कार्यशाळेचे समन्वयक जल अभ्यासक रजनीश जोशी असतील. सदर कार्यशाळा मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, डफरीन चौक येथे होईल. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता होईल.
यावेळी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील डॉ. सतीश काशीद अवर्षणप्रवण सोलापूर जिल्ह्यातील मान्सून अंदाज या विषयावर, रजनीश जोशी सोलापूर जिल्ह्यातील ५० वर्षांतील पर्जन्यमान आणि पुढील वाटचाल या विषयावर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मयुरेश प्रभुणे (पुणे) हेपर्जन्यछायेच्या प्रदेशातील मान्सून या विषयावर, डॉ. अप्पासाहेब पुजारी (सांगोला) हे अवर्षणप्रवण क्षेत्रातील पीकपद्धत या विषयावर विचार मांडतील.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

श्री.धर्मण्णा मो. सादूल, अध्यक्ष
 श्री. राजशेखर वि. शिवदारे, कोषाध्यक्ष
 श्री. दिनेश दे. शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft