banner


अध्यक्षीय समारोपात डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले की, माणसं उभं करण्याचं आणि माणसं पेरण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केलं. यशवंतरावांनी जसा महाराष्ट्र घडवला तसाच महाराष्ट्राने यशवंतराव घडविला असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रात दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्यामध्ये पहिली घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि दुसरी घटना म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये यशवंतरावांचा वाटा अत्यंत मोलाचा ठरतो असं मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक सौताडेकर यांनी केले. याप्रसंगी मंचावर प्रतिष्ठानचे सदस्य ॲड. मनोहरराव गोमारे, कोषाध्यक्ष विवेक सौताडेकर, सोलापूर येथील विजयरत्न डेव्हलपर्सचे विजय जाधव हे उपस्थित होते. आभार प्रदर्शन ॲड. मनोहरराव गोमारे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन शैलजा कारंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, रुक्साना मुल्ला, डॉ. कुसुम मोरे, भीमराव दुनगावे, प्रबुद्ध कांबळे, अॅड. शेखर‌ हाविले, अॅड. वसंतराव उगले, सुनिता राठोड आदींनी प्रयत्न केले.

   

विभागीय केंद्र - लातूर

मा. डॉ. जनार्दन वाघमारे
अध्यक्ष विभागीय केंद्र, लातूर
प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, सचिव
'आई', शिवनगर,
सुतमिल रोड, लातूर - ४१३ ५१२
कार्यालय : ०२३८२ - २००७३१ / ९७६४१९९४०७
ईमेल : rahuljawalge@gmail.com  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft