युवा स्वतंत्रता ज्योत रॅली...

WhatsApp Image 2019 08 15 at 3.55.58 PM


युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा जागृत करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र-अंबाजोगाई तर्फे बाजोगाईत युवा स्वतंत्रता ज्योत रॅली काढण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भौर मॕडम यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मागील अनेक वर्षापासून नियमितपणे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या रॅलीचे आयोजन करण्यात येते.

अंबाजोगाई नगर पालिका काॅम्प्लेक्स मधील विवेक सिंधु कार्यालयासमोरून या रॅलीची सुरूवात झाली. सावरकर चौक - मंडीबाजार - योगेश्वरी देवी मंदीर - शिवाजी चौक - पंचायत समिती - बसस् थानक असे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरून फेरी पूर्ण करण्यात आली.प्र्रतिष्ठान चे सचिव डाॅ. नरेंद्र काळे यांच्या पुढाकाराने दरवर्षी या रॅलीचे आयोजन करण्यात येते.

   

विभागीय केंद्र - बीड (अंबाजोगाई)

 मा. डॉ. अनिकेत द्वारकादास लोहिया
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, बीड
 डॉ. नरेंद्र हिरालाल काळे, सचिव

 ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई, बीड
 कार्यालय : ९४२२७४२६२८ / ९४२२२४२४८८
 ईमेल : dr.narendrakale@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (बीड)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft