सर्वसामान्य माणुस राजकारणात आणण्याचे कार्य यशवंतराव चव्हाण यांनी केले
प्रा. अंबादास घुले

WhatsApp Image 2020 03 11 at 3.50.52 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाई व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण - एक अष्टपैलू व्यक्तीमत्व या विषयी प्रा. डॉ. आबादास घुले, अमरावती यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला मा. आ. पृथ्वीराज साठे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाईचे अध्यक्ष मा. अनिकेत लोहिया, उपाध्यक्ष दगडू लोमटे, सचिव डॉ. नरेंद्र काळे, बबन लोमटे, अभिजीत जोंधळे, प्राचार्या वनमाला गुंडरे, अभिजीत जोंधळे, प्रा. एस. के. जोगदंड, श्रीमती प्रतिभाताई देशमुख, पाशुमियॉ सर, प्राचार्य आण्णासाहेब जाधव इ. उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करुन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र काळे यांनी केले, तर प्रमुख व्याख्याते यांचा परिचय दगडू लोमटे यांनी करुन दिला.
यावेळी व्याख्याते प्रा. डॉ. अंबादास घुले यांनी बोलताना असे सांगितले की, यशवंतराव चव्हाण हे सर्वसामान्य माणुस राजकारणात आला पाहिजे यांसाठी कायम त्यांनी प्रयत्न केले, मानवतावादी दृष्टीकोन साहित्य सध्या उपलब्धता नाही. यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र कृष्णाकाठ आज वैचारिक जडणघडणीसाठी वाचणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमात प्राचार्या डॉ वनमाला गुंडरे, यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पृथ्वीराज साठे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिलीप भिसे यांनी केले, तर आभार प्रा. मुकुंद राजपंखे यांनी मानले, यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाई व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

   

विभागीय केंद्र - बीड (अंबाजोगाई)

 मा. डॉ. अनिकेत द्वारकादास लोहिया
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, बीड
 डॉ. नरेंद्र हिरालाल काळे, सचिव

 ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई, बीड
 कार्यालय : ९४२२७४२६२८ / ९४२२२४२४८८
 ईमेल : dr.narendrakale@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (बीड)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft