यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र-अंबाजोगाई
(बीड जिल्हयाकरीता) यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...

WhatsApp Image 2021 05 02 at 3.54.53 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र - अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळीरक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषद आमदार संजय दौंड, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र-अंबाजोगाई चे अध्यक्ष अनिकेत लोहिया, सचिव डॉ. नरेंद्र काळे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, युवानेते भिमसेन लोमटे, श्री. बालाजी शेरेकर, आदी. उपस्थित होते. १ मे पासून १८ ते २४ वयोगटातील तरुणांना मोफत लसीकरणाची मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहे, याच पार्श्वभूमीवर लसीकरण केल्यानंतर किमान ६० दिवस रक्तदान करता येत नसल्यामुळे राज्यांमध्ये पुढील काही महिने रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणू शकतो, यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र अंबाजोगाई यांच्या पुढाकाराने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले, यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. त्याच बरोबर यावेळी स्वेच्छा रक्तदानासाठी नोंदणी केलेल्या उर्वरित दात्यांच्या रक्तदानासाठी पंधरा दिवसांत आणखी एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येईल असे डॉ. नरेंद्र काळे यांनी सांगितले आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद टेकाळे, कृष्णा सापते, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या तालुका अध्यक्ष कु. प्रियंका गित्ते, युवा वक्ता अविनाश धायगुडे, मनोज गंगणे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. प्रताप जाधव, प्रा. इंद्रजित भगत, प्रा. रोहित पाटील, श्री. रणजित मोरे इ. नी परीश्रम घेतले.

   

विभागीय केंद्र - बीड (अंबाजोगाई)

 मा. डॉ. अनिकेत द्वारकादास लोहिया
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, बीड
 डॉ. नरेंद्र हिरालाल काळे, सचिव

 ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई, बीड
 कार्यालय : ९४२२७४२६२८ / ९४२२२४२४८८
 ईमेल : dr.narendrakale@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (बीड)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft