बीड जिल्हा माझ्या मोबाईल कॅमेर्यातून....
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र- अंबाजोगाई यांच्या वतीने बीड जिल्हा माझ्या मोबाईल कॅमेर्यातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून बीड जिल्ह्य़ातील विविधता पुर्ण निसर्गाचा मोबाईल कॅमेर्यातून टिपलेल्या फोटो ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा अंतिम निकाल हा खालील प्रमाणे आहे.
प्रथम : ज्योतीराम कांदे, लाडझरी, ता. परळी (छायाचित्र टिपलेले ठिकाण :- घाटनांदूर ते दौंडवाडी रोड आनंदवाडी गावाजवळ)
द्वितीय : अक्षय शेळके, देवळा ता. अंबाजोगाई ( छायाचित्र टिपलेले ठिकाण :- मांजरा बंधारा , विश्वरूपी देवीचे मंदिर, देवळा ता. अंबाजोगाई)
संयुक्तिक तृतीय : स्वप्नील ओव्हाळ, अंबाजोगाई (छायाचित्र टिपलेले ठिकाण :- मुंकूदराज परिसर, अंबाजोगाई.) व मंगेश फड, मांडवा ता. परळी (छायाचित्र टिपलेले ठिकाण :- केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी ता. परळी)
सर्वांचे स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक जिकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...