'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' पुस्तिका प्रकाशित...पुणे विभागीय केंद्र : आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकीर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसांच्या खंडाविना पूर्ण होत आहे. यानिमित्ताने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या निमित्ताने आयोजित उपक्रमाची माहिती पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
या पुस्तिकेच्या प्रकाशनाला राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर आनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
http://ycpmumbai.com/images/pdf/parva_parivatan_2016.pdf

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे विभागातर्फे दिवाळी पहाट संपन्न...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे विभागातर्फे आज पहाटे सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न झाला. श्री जयंत नगरकर यांच्या नागरवादन जुगलबंदीने सुरुवात झाली, नंतर बंटी डान्स अकॅडेमी च्या मुलांनी कु. आर्य काकडे यांचे समवेत मल्हारी हे नृत्य सादर केले, नंतर फिटे  अंधाराचे जाळे हा श्री श्रीधर फडके यांचा कार्यक्रम झाला. यावर्षीचा दिवाळी पहाट पुरस्कार श्री. श्रीधर फडके व कु संस्कृती बालगुडे हीला श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे हस्ते महापौर श्री प्रशांत जगताप, श्री अजित निंबाळकर, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, प्रकाश पायगुडे यांचे उपस्थितीत देण्यात आला. पुणेकरांनी मोठा उपस्थिती यावेळी होती.

डॉ. दिलिप गरुड लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'पुस्तकावर
प्रश्नमंजुषेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..

पुणे विभागीय केंद्र : २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावरील प्रश्नमंजुषा मध्ये ७५ शाळांमधील ३५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, त्यांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याशिवाय १. टीन एजर्सचे मनांत २. बुद्धी वर्धन (मन:शक्ती ) ३. आरोग्यम् धनसंपदा याशिवाय राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब या विषयावर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण अन्य सेवक यांचेकडून दोन हजार शब्दसंख्या मर्यादेपर्यंचे निबंध मागविण्यात आले आहेत. त्यांतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.

   

विभागीय केंद्र - पुणे

 मा. श्री. अजित निंबाळकर
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, पुणे
 श्री. अंकुश काकडे, सचिव

 २१८३, सदाशिव पेठ, विशाल सह्याद्री सदन, 
 टिळक रोड, अभिनव कला महाविद्यालयाच्या मागे, 
 पुणे - ४११०३०
 कार्यालय : ०२०-२४३३२६७६
 ईमेल : aijnimbalkar@hotmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft