banner

पुरग्रस्त मदत संकलन केंद्राचे उद्घाटन...

WhatsApp Image 2019 08 13 at 12.12.46 PM

 

परभणी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र परभणी, चतुरंग प्रतिष्ठान परभणी व मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी शारदा महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्तांसाठी मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मदत संकलन केंद्राचे उद्घाटन कृषिभूषण व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय कांतराव काका झरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे समन्वयक विजय काणेकर, अनिल जैन अध्यक्ष मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी व चतुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास पानखेडे उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना मा. कांतराव काका देशमुख यांनी पुरस्थितीमुळे झालेली भीषण अवस्था व या परिस्थितीतून सावरण्यासाठी आम्ही परभणीकरम्हणून मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन केले. त्यानंतर अनिल जैन, विलास पानखेडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
या संकलन केंद्रात दिनांक १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ही मदत संकलित करण्यात येणार असून १६ ऑगस्ट रोजी ती पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे या याची सर्व परभणीकरांनी नोंद घ्यावी .

महिला धोरण पंचवीस वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन...

WhatsApp Image 2019 06 27 at 11.24.01 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक कांतीकारी पाऊल टाकून महिला धोरण लागू केले होते. त्यास आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र परभणीच्या वतीने "महिलांचे स्वयंसिध्दतेकडे वाटचाल"या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दि. २५जून २०१९रोजी परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान परभणी विभागीय केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने प्रशासकिय कामासाठी RFO सौ.सुषमा नाना जाधव व ज्योती बगाटे(कोषाधिकारी)यांना तर उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेला सौ.जयश्री अंबादासराव मुंढे, सौ माधूरी सूधीर राजूरकर व आयशा बेगम यांना कर्तृत्वान महिला म्हणून मान्यवरांचे हस्ते सन्मान-पत्र, पुस्तक व रोपटे देवून यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.सौ.मीनाताई वरपूडकर (महापौर,परभणी म.न.पा.) तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान परभणी केंन्द्राच्या निमंत्रक मा.प्रा.फौजिया खान मॅडम(माजी राज्य मंत्री) मा.सौ.भावनाताई नखाते(उपाध्यक्ष,जि.प.परभणी तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान परभणी केंन्द्राच्या महिला व्यासपीठ प्रमुख)तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा.डॉ.विशाला पटनम, मा.सौ.माधूरी क्षिरसागर, मा.मिता गूलवाडी, मा.श्री.प्रताप देशमुख(माजी.महापौर,म.न.पा.परभणी) मा.श्री.कांतराव देशमुख(झरीकर काका)(सल्लागार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)मा.श्री.विजय कान्हेकर(सचिव,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे संयोजन तथा सुत्रसंचालन मा.सौ.सोनाली देशमुख(राष्ट्रीय सरचिटणीस, महिला आघाडी)तर आभार मा.सौ.नंदाताई राठोड(शहराध्यक्ष महिला आघाडी)यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू वैरागड(समन्वयक,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी)यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणीचे सव॔ सन्माननीय सदस्य तथा शहरातील प्रतिष्ठित महिला, युवती, युवक तथा पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   

विभागीय केंद्र - परभणी

मा. विलास पानखेडे

अध्यक्ष विभागीय केंद्र, परभणी
मा. श्री. विजय कान्हेकर, सचिव

९-राखण योगक्षेम कॉलनी, विसावा कॉर्नर, 
जिंतूर रोड, परभणी - ४३१ ४०१
कार्यालय : ०२४५२-२४२७७७ / ९४२२१७५७०१
ईमेल : vijaykanhekar@gmail.com

 

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft