banner

यशवंतराव चव्हाण यांची १०७ वी जयंती साजरी

WhatsApp Image 2020 03 12 at 11.07.40 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र परभणी व चतूरंग प्रतिष्ठान परभणी तर्फे दि.१२ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची १०७वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे परभणी केंद्रातर्फे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विलास पानखेडे (कार्याध्यक्ष, परभणी केंद्र) तर प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विरसे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरवातीस स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते शिवाजी विरसे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जिवनातील विविध घडामोडी, बालपण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग, त्यांचा राजकीय प्रवास, या सारख्या ईतर अनेक घडमोडी उपस्थित प्रेक्षकासमोर मांडल्या. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोम विलास पानखेडे यांनी केला. या कार्यक्रमाची प्रस्तावना तथा सुत्रसंचालन विष्णू वैरागड तर आभार प्रदर्शन प्रदिप चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी चतुरंग प्रतिष्ठानचे विलासराव चट्टे, अमोल क्षीरसागर, टेकाळे व ईतर मान्यवर तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, परभणी केंद्राचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या अभिवादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.

कॅन्सर प्रबोधन यात्रेचे आयोजन...

WhatsApp Image 2020 02 09 at 2.39.19 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र परभणी, प्रयास अमरावती,आरंभ अहमदनगर व ज्ञानोपासक महाविद्यालय,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कॅन्सर प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी वेळ सकाळी १० वा ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील विविध महाविद्यालयातील युवक व युवतींना कॅन्सर कसा होतो व तो झाल्यावर काय करायला पाहिजे, तो कसा बरा होउ शकतो या विषयी प्रसिध्द कॅन्सर प्रबोधनकार मा. डॉ. अविनाश सावजी यांनी मार्गदर्शन केले व अनेक कॅन्सर ग्रस्त व्यक्तींचे अनूभव कथन या कार्यक्रमात केले.
या कॅन्सर प्रबोधन यात्रेची सुरूवात अहमदनगर येथून दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी झाली. ती यात्रा अहमदनगर,बिड,उस्मानाबाद,लातूर,नांदेड व दि. ७ फेब्रुवारी ला परभणीत सकाळी ९ वाजता आगमन झाले व दिवसभर शहरातील विविध महाविद्यालयात या यात्रेचे प्रबोधन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, परभणी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. सौ. संध्याताई दुधगावकर(प्राचार्य तथा अध्यक्ष परभणी केंद्र) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. भावनाताई नखाते(मा. उपाध्यक्ष जि. प. तथा महिला व्यासपीठ प्रमुख विभागीय केंद्र परभणी) तर प्रमुख मार्गदर्शक प्रसिध्द कॅन्सर प्रबोधनकार तथा थोर समाज सेवक मा. डॉ. अविनाश सावजी तथा कॅन्सर प्रबोधन यात्रेचे संयोजक मा. श्री. प्रदिप काकडे (आरंभ आहमदनगर) तर कॅन्सर योद्धा. सौ. भाग्याश्री वैद्य व खराटे मामा यांनी कॅन्सर सोबत कसा लढा दिला व तो कशा यश्यस्वी केला या बद्दल उपस्थित महाविद्यालयीन युवक व युवंतींना अनुभवकथन केले. या कॅन्सर प्रबोधन यात्रेचे आयोजन श्री. विष्णू वैरागड यांनी केले. यात्रेतील मान्यवराचे भोजन नियोजन मा. श्री. कांतराव काका झरीकर तर पि. डी. जैन. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दाभाडे यांनी केले.

   

विभागीय केंद्र - परभणी

मा. विलास पानखेडे

अध्यक्ष विभागीय केंद्र, परभणी
मा. श्री. विजय कान्हेकर, सचिव

९-राखण योगक्षेम कॉलनी, विसावा कॉर्नर, 
जिंतूर रोड, परभणी - ४३१ ४०१
कार्यालय : ०२४५२-२४२७७७ / ९४२२१७५७०१
ईमेल : vijaykanhekar@gmail.com

 

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft