यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक,
नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी या विषयावर व्याख्यान...

WhatsApp Image 2021 08 13 at 6.38.23 PM


 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष व्याख्यानाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत ‘स्वातंत्र्याची पंचाहत्तरी’ या विषयावर नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे मानद व्यवस्थापक व जेष्ठ विचारवंत दत्ता बाळसराफ यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान facebook/ycpnashik या लिंकवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी सायं 6:30 वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या ऑनलाइन व्याख्यानास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष व नवमहाराष्ट्र युवा अभियानचे सहसंयोजक विश्वास ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
स्वातंत्र्यपूर्वीचा काळ कसा होता, विविध स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तसेच भारताचा एकूण राजकीय व सामाजिक इतिहास तरुणांना समजावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या अभ्यासातून संपूर्ण भारताच्या जडण घडणीचा लेखाजोखा ते या व्याख्यानाद्वारे आपल्यासमोर मांडणार आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात येत असते त्यात युवक युवती मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवित असतात. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या फेसबुकद्वारे संपन्न होणार्‍या व्याख्यानाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे,
डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा तसेच भूषण काळे व वेदांशू पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9657439833/9145095757 या क्रमांकावर संपर्क साधावा.

समकालीन मराठी रंगभूमी झूम व्याख्यान...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक आयोजित 'लोकसंवाद' उपक्रमांतर्गत व्याख्यान समकालीन मराठी रंगभूमी शनिवार दिनांक 31 जुलै 2021 रोजी 4 वाजता झूमच्या माध्यातून होणार असून व्याख्याते श्री. गिरीश पतके, सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक देणार आहेत. झूमवर उपस्थित राहण्यासाठी लिंक
https://us02web.zoom.us/j/3811006367?pwd=UVhiL05lNWw4djJzT1RodzF2Ly9FZz09
Meeting ID: 381 100 6367
Passcode: 1234

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. डॉ. कैलास कमोद, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft