आजच्या चित्रपटांचे विषय व आशय प्रधान, नवा विचार देणारे

                                          - अशोक राणे (चित्रपट समीक्षक)

WhatsApp Image 2020 01 18 at 9.48.49 PM

नाशिक (दि. १८) : सिनेमा हे सर्व कलांचा संगम असून अविष्काराची अनेक रूपे त्यात असतात. सादरीकरणाच्या शक्यता सामावलेल्या असतात. त्यामुळे सिनेमाच्या कुतुहलामुळे या माध्यमाकडे वळलो आणि तो जगण्याचा भाग झाला. फिल्म सोसायटीची चळवळ माझ्यासाठी जगण्याचं,सिनेमाचे विद्यापीठच होय. त्यातून मी घडत गेलो. आजचा सिनेमा बदलला असून आजच्या पिढीची दृश्याविषयीचे आकलन बदलले आहे. त्यामुळे दृश्यभाषा बदलली आहे. वाढते चॅनेल्स,सिनेमांची निर्मिती वाढली आहे. त्यातून सिनेमाविषयीची व्याख्याच बदलली आहे. नवे प्रश्‍न, काळाचे प्रश्‍न घेऊन येणार्‍या सिनेमांना रसिकांची मागणी आहे असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक अशोक राणे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट,नाशिक,सारस्वत बँक,रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक राणे यांच्या सिनेमा पाहिलेला माणूसया पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अशोक राणे यांची मुलाखत डॉ. कैलास कमोद यांनी घेतली. यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास कथन केला. विश्र्वास हब येथे हा कार्यक्रम झाला
१९९० पासून सिनेमा बदलत असून अ‍ॅक्टीव्ह ऑडीअन्स तयार झाला आहे. आजच्या तरूण दिग्दर्शकांनी जुने मराठी-हिंदी सिनेमे आवर्जुन बघावेत व परंपरा समजून घ्यावी व आपले वेगळेपण दिग्दर्शनातून सिद्ध क रावे. मेहनत व अभ्यास करावा. मल्याळी चित्रपट क्षेत्र आधुनिक असून त्यात नव-नवीन व आशय प्रधान सिनेमे तयार होत आहेत. प्रादेशिक सिनेमे बघावेत व आपली जाण समृद्ध करावी.
समाजातील बदलत्या प्रश्नांचा वेध दिग्दर्शकांनी घ्यावा,दादासाहेब फाळके या चित्रमहर्षींनी आपल्याला सिनेमाचे नवे जग दाखवले व जगण्याला नवा विचार,आनंद दिला त्याची आपण जपणूक करावी असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व अशोक राणे यांचा परिचय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिकचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला. प्रतिष्ठानचे सचिव डॉ. कैलास कमोद यांनी अशोक राणे व विवेक गरूड यांचा सन्मान केला. कार्यक्रमास विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी,मिलींद धटिंगण,रघुनाथ फडणीस,श्रीकांत वाबळे,गजानन ढवळे,रणजीत गाडगीळ,आशिष चव्हाण,विश्वास को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूर विश्वास
रजिंदर कौर यांच्या स्वरांतून निथळली ईश्वरभक्तीची आस

82335128 1315615131980129 4934641484340133888 n


नाशिक (प्रतिनिधी) : सकाळच्या प्रसन्न थंडीत सुरांची अलवार भेट सर्वांना सुखावून गेली आणि स्वरमाधुर्य आणि अस्सल सुरांची भेट रसिकांना आनंद देऊन गेली. स्वर आणि शब्दांतील नाद यांची जाणीव शास्त्रीय संगीतातील प्रयोगांची नवी ओळख करून देणारा होता.
विश्वास गृ्रपतर्फे ‘सूरविश्वास’चे बारावे पुष्प रजिंदर कौर यांच्या स्वरांनी गुंफले. नटभैरव रागाने त्यांनी मैफिलीची सुरूवात केली. शब्द होते ‘लालन तुमसे भली न हो’ एक अनाहत नाद आणि शब्दा-शब्दांतून निथळणारा आशय यातून मैफल रंगत गेली. त्यानंतर ‘दादरा’ सादर केला. ‘सैय्या मोरे तोरी बाकी नजरीया’ यातून आर्तता आणि प्रेमाचा, आपुलकीचा स्रोत स्वरांतून ओसंडत होता. यानंतर पंजाबी भावभक्तीचा स्वर शबद मधून सादर केला. भक्ती आणि जीवन जगण्यातला आनंद यातून निनादत होता. ‘सून यार हमारे सजन’ ही विनवणी होती. भैरवी ने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘आयी शरण निहारी’तून परमेश्वर भक्तीची आस व्यक्त केली. सुजीत काळे (तबला), कृपा परदेशी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ‘विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम विश्वास गार्डन, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे रा.शं. दातार नाट्यगौरव पुरस्काराबद्दल दत्ता पाटील यांना रमेश देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कलावंतांचे सन्मान रागीणी कामतीकर, डॉ.मनोज शिंपी, अमर भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. डॉ. कैलास कमोद, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft