जागतिक महिला दिन

महिलांनी संतुलित आहार व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा

- डॉ. कल्पना संकलेचा

WhatsApp Image 2020 03 09 at 5.23.54 PM 1

नाशिक (दि. ९) : आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून मनाची व शरीराची काळजी घेणे म्हणजेच जीवनाचा आनंद घेण्यासाठी सक्षम होणे होय. त्यासाठी जीवनसत्वयुक्त आहार, व्यायाम व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना सुधीर संकलेचा यांनी केले.
विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व आरोग्यया विषयांवर डॉ. सौ. कल्पना संकलेचा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रम विश्वास हब येथे संपन्न झाला.      
डॉ. सौ. संकलेचा यांनी यावेळी अ‍ॅनेमिया, फायब्रॉइड, विविध कॅन्सर या आजारांची लक्षणे व वेळीच घ्यायची काळजी तसेच रक्तदाब, हिमोग्लोबिन, बोन डेन्सीटी या तपासण्यांची गरज सांगितली व उपस्थित महिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना विश्वास ठाकूर म्हणाले की, कुटुंबाला घरपण देणारी महिला, अनेक आघाड्यांवर मेहनतीने, निरपेक्षपणे लढत असते. तिचे आरोग्य उत्तम तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम असते. म्हणूनच महिलांनी आपल्या आरोग्याकडे
लक्ष द्यावे.
यावेळी कोरोना व्हायरस विषयी जनप्रबोधनपर माहिती व उपायांविषयी माहिती देण्यात आली. बँकेच्या कर्मचारी, अधिकार्‍यांना हँड सॅनिटायझर, ग्लोजचे वाटप करण्यात आले.
डॉ. कल्पना संकलेचा यांचे स्वागत वैशाली जामदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे, प्रियंका ठाकूर आदिंनी परिश्रम घेतले.

सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या
गझलदीपकार्यक्रमाचे आयोजन...

WhatsApp Image 2020 02 29 at 5.42.28 PM

नाशिक (दि. २) : महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीपया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ११ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
उर्दू व हिंदी गझलेपासून सुरू झालेला मराठी गझलपर्यंतचा प्रवास प्रदीप निफाडकर उलगडून दाखविणार आहेत. मराठी गझलेची समृद्ध परंपरा कशी बदलत गेली याचे उदाहरणासह व्याख्यान ते देणार आहेत. अमीर खुस्रो ते माधव जुलियन,सुरेश भट ते आत्ताच्या गझलपर्यंतचा हा प्रवास आहे. गझलेत वात्सल्यता आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे श्री. प्रदीप निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे अंतरंग शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता स्वप्नमेणा. त्यांनी गझलया काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव गझलदीपआहे. वेगळे वाटसरूहे त्यांचे व्यक्तिचित्रणाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनाथ मुलांच्या भविष्यावर नजर टाकणार्‍या मालिकेचे आभाळ पेलणारे आयुष्यहे पुस्तक लिहीले आहे. निफाडकर यांनी २४ तीर्थंकरावर गाणी लिहिली आहेत. ती सर्व गीते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. त्या गीतांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. गझलसम्राट सुरेश भट आणि...हे गुरूवर्य सुरेश भट यांचे चरित्रात्मक आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तत्पूर्वी भट यांच्या अप्रकाशित कवितांचे संपादन करण्याचे भाग्य निफाडकर यांना लाभले.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन मानद अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. डॉ. कैलास कमोद, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft