यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक व
विश्वास ग्रुपतर्फेखुल्या ऑनलाईन काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर....

WhatsApp Image 2020 10 26 at 8.36.46 PM


नाशिक (प्रतिनिधी) : बदलणार्‍या सामाजिक वास्तवाचा, जीवनशैलीचा कोवीड-19 चा प्रादुर्भाव, त्याचबरोबर प्रेमाचं, भावभावनांचं प्रतिबिंब, शेतकर्‍यांच्या दु:खाचं आणि चिंतन करणार्‍या कवितांनी बहर कवितेच्या ऑनलाईन काव्यस्पर्धेत  कवींनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. सदर स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील मुंबई, चंद्रपूर, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, पुणे, अहमदनगर, गडहिंग्लज, नांदेड, सोलापूर, अकोला व नाशिक अशा विविध ठिकाणांहून स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी स्पर्धेची गुणवत्ता वाढविण्यास मदत केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे
प्रथम क्रमांक : श्वेता अजय पाटील, धुळे - रुपये 2001 व प्रमाणपत्र कवितेचे नाव : आयुष्याची जीवनगाथा
द्वितीय क्रमांक : सायली रविंद्र पवार, साक्री, जि.धुळे - रुपये 1501/- व प्रमाणपत्र कवितेचे नाव : हे नारी
तृतीय क्रमांक : तेजस्वी रविंद्र महाडिक, नवी मुंबई - रुपये 1001/- व प्रमाणपत्र कवितेचे नाव : मुंबईचे आत्मगीत
उत्तेजनार्थ क्र. 1 : सुनील म्हसकर, शहापूर, जि. ठाणू - रुपये 501/- कवितेचे नाव : सृष्टीचे नंदनवन करण्या
उत्तेजनार्थ क्र. 2 : आस्था शालिकराम घरडे, चंद्रपूर, जि. चंद्रपूर - रुपये 501/- कवितेचे नाव : आई
उत्तेजनार्थ क्र. 3 : श्रद्धा निगडे, मुलुंड, मुंबई - रुपये 501 कवितेचे नाव : अवकाश
तरी या खुल्या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा आदिंनी अभिनंदन केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. डॉ. कैलास कमोद, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft