झुंडशाहीच्या विचारांचे दडपण आपल्या भाषणात येऊ देऊ नका, मोकळेपणे व्यक्त व्हा : श्रीपाद भालचंद्र जोशी

यशवंत शब्दगौरव नागपूर विभागीय फेरीचा अभिजीत खोडके मानकरी !

WhatsApp Image 2019 09 08 at 7.44.33 PM
नागपूर (दि.८) : सध्या देशात झुंडशाहीच्या विचारांचे प्राबल्य आहे. तुम्ही कसे वागायचे, काय बोलायचे, काय वाचायचे हे ठरवणारे लोक निर्माण झाले आहेत. तुम्ही त्याच्या विरोधात गेलात की तुम्ही देशद्रोही होता. पण तो विचार माणुसकीला धरून नसेल तर त्याचे समर्थन करू नका. आपला विवेकी विचार जिवंत ठेवा आणि तोच तुमच्या शब्दांमधून व्यक्त करा,असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व युगांतर शिक्षण संस्थेचे तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या नागपूर विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी जोशी बोलत होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी, संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, सचिव विवेक कोबाडे यांचे मार्गदर्शन लाभले, याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळपांडे, सरचिटणीस गणेश गौरखेड़े, प्राचार्य डॉ. दीपक मसराम, डॉ.स्वाती धर्माधिकारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. अर्शिया सैय्यद,प्रा. दिगंबर टूले, प्रा. सचिन हुँगे, बाबा कोम्बाडे, अभिजित राऊत, निशिकांत काशीकर, जगदीश पंचबुद्धे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. कल्पना उपाध्याय,डॉ. मंजुषा सावरकर, प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेत नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ६० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

युवा स्वातंत्र्य ज्योतकार्यक्रमाचे आयोजन...

WhatsApp Image 2019 08 14 at 12.32.41 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार, दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ११.०० वाजता युवा स्वातंत्र्य ज्योतकार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान चौक, नागपूर येथे करण्यात येत आहे.
करिता आपणास विनंती करण्यात येते की, उपरोक्त युवा स्वातंत्र्य ज्योतकार्यक्रमास आपण उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

   

 विभागीय केंद्र - नागपूर

 मा. श्री. गिरीश गांधी
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नागपूर
 मा. श्रीमती कोमल ठाकरे, सचिव

 द्वारा : वनराई फाऊंडेशन,
 यश काॅम्लेक्स, २ रा माळा,भरतनगर चौक,
अमरावती मार्ग, नागपूर - ४४००३३.
 कार्यालय : ०७१२-२२६११६३
 ईमेल : vanaraingp@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft