banner

WhatsApp Image 2019 11 06 at 1.01.42 PMयशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार
प्रशांत खेडेकर यांना जाहीर !

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्रामार्फत देण्यात येणारा पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार कळमनुरी जि. हिंगोली येथे कार्यरत उपजिल्हाधिकारी श्री. प्रशांत कैलास खेडेकर यांना जाहीर झाला असून येत्या २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नांदेड येथे महात्मा गांधी यांचे पणतू जेष्ठ गांधी अभ्यासक मा. तुषार गांधी यांच्या हस्ते व माजी शिक्षणमंत्री तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्राचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पंधरा हजार रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

   

विभागीय केंद्र - नांदेड

मा. श्री. कमलकिशोर कदम 

अध्यक्ष विभागीय केंद्र, नांदेड
मा. श्री. शिवाजी गांवडे, सचिव

१२, भाग्यनगर, नांदेड- ४३१६०५
कार्यालय : 
ईमेल :

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft