यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नांदेड आयोजित
राज्यस्तरीय ऑनलाईन भीमगीत गायन स्पर्धा...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नांदेड आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन भीमगीत गायन स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धा भीमगीत व्हिडिओ शूटिंग करुन १४ एप्रिल २०२१च्या सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत भ्रमणध्वनी क्रमांक ८८८८६५७५१७ नंबरवर व्हॉटअँप करावेत असे आवाहन विभागीय केंद्र नांदेडचे सचिव शिवाजी गावंडे केले आहे. स्पर्धेतील विजेत्यास प्रथम क्रमांकाची रोख रक्कम ७०००/-, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ५०००/- , तृतिय क्रमांक रोख रक्कम ३०००/- व उत्तेजनार्थ १०००/- रुपये दिली जाणार आहे.
चला तर मग बंधू गभिनिंनो आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या कोरोनाच्या भयग्रस्त परिस्थितीत भीमगीत गाऊन आदरांजली वाहूया आणि आपण कोरोनाला शासनाचे नियम पाळून हरवूया..
समाजाने नीतीमूल्यांवर अढळ श्रद्धा ठेवावी..
तुषार गांधी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान...
नांदेड : महात्मा गांधी यांचे विचार जगाला आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. महात्मा गांधींनी विचार आणि तत्व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. आजचा समाज त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून बघत असेल तर समाजाने नीतिमूल्यावर अढळ श्रद्धा ठेवताना जे चांगले आहे ते चांगले आणि जे वाईट आहे त्या विरोधात सर्वांनी मिळून आवाज उठवलाच पाहिजे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त तुषार गांधी याचे 'गांधीजींना व त्यांच्या विचारांना आपणास कसे जोडता येईल' या विषयावर शंकरराव चव्हाण सभागृहात व्याख्यान पार पडले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नांदेड विभागाचे अध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम, उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, बापू दासरी, देविदास फुलारी, डॉ. गीता लाठकर, मनोरमा चव्हाण, कल्पना डोंगळीकर यावेळी उपस्थित होते.