यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबईतर्फे आज शिवथाळीचे वाटप..
WhatsApp Image 2021 05 01 at 1.26.16 PM

आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्रातर्फे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या संत गाडगेबाबा धर्मार्थ निवास, खारघर, नवी मुंबई येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या इथे वास्तव्यास असलेल्या सर्व नातेवाईकांस शिवथाळी भोजन आयोजन केल्याचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ अशोक पाटील यांनी कळविले आहे. कोरोनामुळे लॉक डाउन परिस्थितीत रुग्ण नातेवाईकांना बाहेर जाऊन भोजन करणे अडचणीचे झाले आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे ही शिवथाळी आज दुपार व रात्र दोन्ही भोजनासाठी असून कार्यकारी मंडळ सदस्या अमरजा चव्हाण यांनी प्रायोजित (स्पॉन्सर ) केली आहे. याचबरोबर सध्या दवाखान्यांना रक्त पुरवठा कमी प्राप्त होत असल्याने प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्राने रविवारी दि 9 मे 2021 रोजी स्टर्लिंग कॉलेज, सेक्टर 19, नेरुळ येथे सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत टाटा मेमोरियलच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. नवी मुंबई येथील सर्व नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, नेते, नगरसेवक यांनी चांगल्या कार्यात सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी केले आहे. प्रस्तुतचे प्रतिष्ठानचे दोन्ही कार्यक्रम यशवंत सन्मान पुरस्कार प्राप्त रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री यांच्या अथक प्रयत्नाने संपन्न होत असून नव्या मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असे विविध उपक्रम घेतले जात आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रमार्फत
रक्तदान शिबिर व शिवथाळी भोजनाचे आयोजन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे रक्तदान शिबीर व रुग्ण नातेवाईकांसाठी शिवथाळी आयोजन करणेत येत आहे. आपले यशवंत सन्मान प्राप्त रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री आपल्याला रक्तदान शिबीर घेणेस संपूर्ण मदत ( आयोजन, डॉक्टर्स, मशीनरी ) करणार आहेत. सचिव डॉ अशोक पाटील यांनी स्टर्लिंग कॉलेज जागा देऊ केली आहे. तरी, मी शनिवार दि ८ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजनाची तारीख टाटा संस्थेस कळवित आहे. सर्व managing committee मेंबर्सनी सक्रिय सहभाग उपस्थित राहून घ्यावा व प्रत्येकाने किमान १० रक्त दाते या आज आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण उपक्रमास सक्रिय हातभार लावावा. रक्तदात्याचे नाव, मोबाईल नंबर मला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ह्या ई-मेल वर आगाऊ नोंदणी केल्यास आणखी उत्तम. रक्तदानाच्या प्रतिष्ठानच्या उपक्रमात आपले सामाजिक कार्यकर्ते, नेते यांनाही सहभागी करावे. रवींद्र इथापेजी, नेत्राजी शिर्के, सलुजा जी व संदीप जी सुतार, गावडे शेठ ह्या आपल्या लोकप्रिय नगरसेवकांचा सहभाग अपेक्षित आहे तसेच, रुग्ण मित्र अग्निहोत्री यांनी सुचविलेल्या कॅन्सर हॉस्पिटल, खारघर येथे परगावावरून रुग्णांसोबत येऊन राहणाऱ्या नातेवाईकांना आपण एक दिवस प्रतिष्ठान तर्फे ह्या लॉकडाउन काळात दुपारचे जेवण (शिवथाळी ) द्यावयाची आहे. त्यासाठी मी १ मे २०२१ ही महाराष्ट्र दिनाची तारीख सुचवित आहे. सदस्यांनी दुपारी १२.३० वाजता खारघर हॉस्पिटल येथे २ तासासाठी यावे व आयोजनात सक्रिय सहभाग द्यावा.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft