वृक्षारोपण समारंभ

WhatsApp Image 2019 07 21 at 2.30.47 PM 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई आणि नेरुळ- बेलापूर वॉकर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पारसिक हिलवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम व जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. दोन्ही संस्थांचे अध्यक्ष श्री प्रमोद कर्नाड, नगरसेवक व सभागृह नेता रवींद्र इथापे, नेत्रा शिर्के, सलुजा व संदीप सुतार यासह सुमारे १५०सदस्य उत्साहात हजर होते व वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्तम संपन्न झाला.

नवी मुंबईत रंगली कविमय पावसाळी सायंकाळ...

WhatsApp Image 2019 07 06 at 11.12.01 PM 2

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्ताने कवी कुसुमाग्रज वाचनालय व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राच्या संयुक्त विद्यमाने काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजितकरण्यात आला होता. कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड "खेकडे" ही उपहासगर्भ कविता सादर केली. यावेळी आर. जे.व युवा कवी प्रणव चव्हाण,गझलकार आप्पा ठाकूर यासह अनेक नामवंत व तसेच नवकवी सहभागी झाले होते. ललित पाठक, डॉ अशोक पाटील,प्रवीण पाटील यांसह अनेक रसिकांनी त्यांस भरभरुन दाद दिली. प्रज्ञा लालिंगकर यांचे ओघवते सूत्र संचलन कार्यक्रमाची उंची वाढवत गेले.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft